राहुरी शहरातील विविध भागातून श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गा दौडचे आयोजन .
श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गा दौडचे आयोजन..
दुर्गामाता दौड ही राहुरी शहरातील विविध भागातून भगव्या झेंड्याची मिरवणूक( रॅली ) काढून साजरी केली जाते.राहुरी शहराच्या संपूर्ण भागातून ही दौड पहाटे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करून सकाळी सात वाजता निघत असते. नवरात्रीचे नऊ दिवस ही दौड निघत असते. या दवडीमध्ये लहान मुलांपासून तरुण मुलांपर्यंत तसेच युवती देखील सहभागी असतात.
श्री शिवाजी,श्री संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण व्हावी.ही पिढी सदृढ असावी, देव देश धर्माचं रक्षण करणारी असावी यासाठी नवदुर्गेचा जागर हा उपक्रम आहे. हिंदू ग्रुप राहुरी शहर, अखंड हिंदू समाज यातील सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी असतात.यात अनेक पद्य व देशाहिताचे गीत म्हंटले जातात.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिथे जिथे आहे तिथे तिथे देशभर या मिरवणुका निघतात, अनेक संघटनांचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असतात. मोठ्या उत्साहात आणि जोशामध्ये या मिरवणुकीचे स्वागत केले जाते. महिला या ध्वजाला ओवाळतात आणि औक्षण करतात.








