सतीश भोसले उर्फ खोक्या गजाआड, कसा आणि कुठे सापडला खोक्यां भाई...?

सतीश भोसले उर्फ खोक्या गजाआड, कसा आणि कुठे सापडला खोक्यां भाई...?
प्रतिनिधी _ आमदार सुरेश धस यांच्या निकटवर्तीय असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याचे वादग्रस्त व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यापासून एकच संतापाची लाट उसळली होती, त्यामुळे खोक्या हे नाव राज्यभर चर्चेत आले होते.
नेमके प्रकरण काय..?
बीड जिल्ह्यातील मूळचा रहिवासी असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई, याने दोन व्यक्तींना आमानुष्यपणे मारहाण करणे व एका व्यक्तीला ब्याटने मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यापासून एकच संतापाची लाट उसळली होती, त्यामुळे सतीश भोसले विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, तेव्हापासून भोसले फरार झाला होता.
प्रसार माध्यमांना मुलाखत मात्र पोलिसांना चकवा.?
सतीश भोसले याने मी निर्दोष असल्याबाबत प्रसार माध्यमांना दोन दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती, खोक्या हा पत्रकारांना सापडतो मात्र पोलिसांना सापडत नाही त्यामुळें पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका होतांना दिसत होती, त्यानंतर काही तासांतच खोक्याला बीड पोलिसांनी अटक केली.
कुठे आणि कसा सापडला खोक्या भाई.?
सतीश भोसलेवर वेगवेळ्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याने, बीड पोलिसांचे खोक्यावर विशेष लक्ष होते, बीड पोलीसांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार भोसले हा, उत्तर प्रदेश येथे असल्याने, बीड पोलिसांचं पथक उत्तर प्रदेश येथे_ युपी पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम घेत असताना, खोक्या भोसले याला उत्तर प्रदेश येथील प्रयागराज मधुन मध्यरात्री अटक केली, भोसले याला अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.