ख्रिश्चन तसेच विधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले भारतभर प्रसिद्ध, नवसाला पावणारी हरेगाव तीर्थक्षेत्री मतमाऊलीच्या ७५ व्या वर्षीच्या आमृत महोत्सवी यात्रा उत्सव साजरा.

श्रीरामपूर - दि. ०९/०९/२०२३ ख्रिश्चन तसेच विधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले भारतभर प्रसिद्ध, नवसाला पावणारी हरेगाव तीर्थक्षेत्री मतमाऊलीच्या ७५ व्या वर्षीच्या आमृत महोत्सवी

आज सकाळी ९ वाजता सालाबादाप्रमाणे नोव्हीना होऊन मतमाऊलीला हरेगाव संत तेरेजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. डाॅमिनिक रोझारियो व सहाय्यक धर्मगुरू आणि उपस्थित धर्मगुरू यांच्या हस्ते मुकूट चढवून मतमाऊली यात्रेला विधीवत सुरुवात झाली. लगेचच ठिक १० वाजता सर्व धार्मिकांसाठी मिस्सा अर्पण करण्यास सुरुवात केली. या हरेगाव मतमाऊलीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने भाविक उपस्थित होते. सर्व भाविक दर्शनासाठी शिस्त व नियमांचे पालन करतांना दिसले. स्वंयसेवक भाविकांची दक्षता, शिस्त व नियम पाळण्याच्या सुचना देत होते. पदयात्रा येणाऱ्या भाविकांसाठी अल्पोपहार पाणी सुविधा पुरविणे करिता दानशूर संघटना यांनी रस्त्याच्या कडेला स्टाॅल  लावलेले दिसले. भाविकांची सुरक्षाविषयक दक्षता घेण्यासाठी श्रीरामपूर पोलीस कर्मचारी कर्तव्य करतांना तैनात करण्यात आलेले दिसले. श्रीरामपूर नगरपालिकेचे अनुराधाताई आदिक, जयश्री ससाणे  यांनी मतमाऊलीचे दर्शन घेऊन  भाविकांना यात्रे निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.  Delhi 91.com    Bpslivenews...... Reporter.. Prakash Nikale.. Shrirampur.