संकष्टी चतुर्थी निमित्त आव्हणे गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन .

संकष्टी चतुर्थी निमित्त आव्हणे गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन .

संकष्टीचतुर्थी निमित्त आव्हणे गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रम. 

 

 

आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील गणपती आव्हणे येथे दि.7 रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी 7 वा. पैठणवरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने श्रीची आरती व महाभिषेक श्री.रामदास तांभोरे काळेगाव यांच्या हस्ते होईल. दुपारी 12 वा. भाविकांना फराळाची व्यवस्था श्री.रामदास तांभोरे काळेगाव याच्या वतीने करण्यात आली आहे.सायंकाळी 6 वा. ह.भ.प.उद्धव महाराज झिरपे संत तुकाराम वारकरी शिक्षण सस्था चापडगाव यांचे कीर्तन होईल. सायं. 7 वा. श्रीची आरती व महाभिषेक श्री.भूषण प्रभाकर कुलकर्णी साहेब अहमदनगर याच्या हस्ते होईल. रात्री 9 वा.श्री.भूषण प्रभाकर कुलकर्णी साहेब अहमदनगर यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यानंतर दादोबा देव एकतारी भजनी मंडळ आव्हाणे बु यांचा जागराचा कार्यक्रम होईल, अशी माहिती स्वयंभु निद्रिस्त गणपती आव्हाणे बु ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मालोजीराव भुसारी, सरचिटणीस अर्जुनराव सरपते, माजी विश्व्स्त अंकुश कळमकर, रामदास दिवटे, कारभारी तळेकर, सुधाकर चोथे, नारायण जाधव, वसंत भालेराव, सचिव लक्षिमन मुटकुळे यांनी केले आहे.