महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकरी पुत्र मुख्यमंत्री शिंदे भक्कमपणे उभे - संजय मोरे
महारष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकरी पुत्र मुख्यमंत्री शिंदे भक्कम पणे उभे – संजय मोरे
राहुरी येथे नुकताच महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त ३५०० शेतकऱ्यांचा मेळावा २७ सप्टेंबर २०२४ रोजी राहुरी, अहमदनगर येथे यशस्वीरित्या पार पडला. हा मेळावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमामुळे शेतकरी समाजासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव, आव्हाने आणि नवकल्पना मांडण्यासाठी एक वेगळे व्यासपीठ मिळाले अशी भावना राज्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात शेखरजी भडसावळे, कृषी संघटनेचे अध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली झाली, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सचिव संजय मोरे,माजी खासदार सदाशिव लोखंडे,प्रशांत पाळंदे,शेतकरीसेना प्रमुख धनंजय जाधव,युवा नेते प्रशांत लोखंडे उपस्थिती लावली.नाथराव कराड कार्यकारी प्रमुख, यांनी प्रास्ताविक केले.
शिवसेना नेते संजय मोरे यांनी शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या मागण्यांना ऐकण्याची आणि त्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमातून संकलित केलेल्या सूचना राज्यस्तरीय समिती तयार करण्यासाठी वापरल्या जातील, ज्यामुळे शेतमालाच्या योग्य किमतीची हमी, पिकांचे संरक्षण, आणि विविध उपाययोजना सुचवण्यात येतील.महाराष्ट्राला लाभलेले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा ते जाणून आहेत.आतापर्यंत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून खुप झालेत.परंतु शेतकऱ्यांना सन्मान करून शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री सदैव उभे आहेत असे मोरे म्हणाले.
शेतकरी सन्मान कार्यक्रम हा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा, एकात्मता, आणि नवकल्पनांचा उत्साह निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या आणि विविध संस्थांच्या सहकार्याने या मेळाव्याने शेतकऱ्यांना नवी दिशा देऊन मानसिक आधार आणि कृषी सुधारणा यासाठी ठोस उपाययोजना सुचविल्या आहेत असे मा.खा.सदाशिव लोखंडे म्हणाले.राज्यभरातून आलेल्या कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे स्वागत शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी केले.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवले,नितीन औताडे,कमलाकर कोते,अनिल शिंदे,जिल्हा नियोजन समितीचे बाजीराव दराडे,शुभम वाघ,सुनील खपके,अशोक साळुंके,प्रदीप वाघ,संतोष डहाळे,उज्वला भोपळे,शबनम इनामदार,शोभा अकोलकर,वनिता जाधव,रोहित नालकर,प्रशांत खळेकर,महेंद्र उगले,महेंद्र शेळके,सचिन पवार,बाळू जाधव,गानाग्धर सांगळे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना राहुरी तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.