महाराष्ट्रातील सर्व जनता सुखी, समृद्धी व निरोगी राहूदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची हनुमंतरायाला प्रार्थना .

नागपूर

महाराष्ट्रातील सर्व जनता सुखी, समृद्धी व निरोगी राहूदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची हनुमंतरायाला प्रार्थना .

महाराष्ट्रातील सर्व जनता सुखी, समृद्धी वनिरोगी राहूदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची हनुमंतरायाला प्रार्थना Delhi 91 BPS Live news network                        नागपूर:-महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गावोगावी भेटी दिल्या . यामध्ये त्यांनी टेकडी बाभूलखेडा, कोराडी, पांजरा या ठिकाणी

गावातील नागरिकांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या . नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी त्याच गावांमधील हनुमान मंदिरात जाऊन हनुमंतरायाचे दर्शन घेतले . हनुमान जन्मोत्सवानिमित पंचमुखी टेकडी बाभूळ खेडा, (बेलोरी )टेकडी येथे दर्शन घेउन सर्व हनुमंत भक्त बंधू बघिनींना शुभेच्छा दिल्या .त्या वेळेला राज्यiतील जनता सुखी, समृद्धी व निरोगी राहो अशी हनुमंतरायाला प्रार्थना केली . त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आरती पूजा, पाठ करण्यात आले . लोणखैरी येथील हनुमान देवस्थान येथील दर्शन घेऊन कोराडी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर व हनुमान मंदिर पांजरा येथे जावून दर्शन घेतले . लोकनेते श्री .चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पंचायत समिती सदस्य सौं . सविताताई रामचंद्र जिचकार यांची भेट घेतली . गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य गावकरी बंधू भगिनींना व उपस्थित नागरिकांना हनुमान जयंतिच्या शुभेच्छा दिल्या .