*बार्शी तालुका पोलीसांची 4,61,000/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करत धडाकेबाज कामगिरी*

*बार्शी  तालुका  पोलीसांची 4,61,000/-रुपयांचा  मुद्देमाल  जप्त  करत  धडाकेबाज  कामगिरी*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे बार्शी (बळेवाडी)

बार्शी. (ता.बार्शी)      नूतन पदभार स्वीकारलेले बार्शी तालुका सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या चाणक्य नीतीने त्यांच्या पथकांनी कोरफळे येथील घरफोडी केलेल्या अट्टल 3 आरोपींना पकडण्यात यश आले. बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीमधील कोरफळे येथील दि.23-10-2022 रोजी पहाटे 3 वाजता काही अज्ञात कुख्यात चोरट्यांनी कोरफळे येथील राहणारे मस्के आणि हागरे यांच्या दोन्ही घरी कटवणीच्या साह्याने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून घरफोडी व एका घरातील रहिवासी राहत असून त्याला सत्तुरचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने घेऊन गेले होते.

त्याबाबत बार्शी पोलीस ठाणे येथे वेगवेगळे दोन गुन्हे दाखल होते.एकाच दिवशी घरफोडी व जबरी चोरी झाल्याने नूतन पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी जालिंदर नालकुल साहेब, स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस अमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार केले होते अशी माहिती नूतन सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी दिली.

एकाच दिवशी ऐन दिवाळीच्या वेळेस घरफोडी झाल्याने गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत 48 तासांच्या आत या घरफोडीचा निकाल लावला गेला आहे. एकूण दोन्ही घरफोडीतील 3 लाख 66 हजार रुपयाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. तसेच त्यांच्या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असे एकूण 4 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपीवर बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर या तीन कुख्यात अट्टल तीन आरोपींची नावे 1)सुनील श्रावण शिंदे रा.उस्मानाबाद, 2)झोक्या उर्फ रवी अरुण काळे रा.देगाव, 3)किरण अरुण पवार रा.रायगड.    स.पो.नि. महारुद्र परजणे यांच्या धडाकेबाज कामगिरीने बार्शी तालुका पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.