*पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी कडून वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन्सिल व खाऊ वाटप*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज, सोलापूर.
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी.-
दि.01-03-2022 रोजी बार्शी शहरातील समाजसेवक गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे मा. श्री विशाल भैय्या वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त.
पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी कडून केक, बुके व इतर प्रजेंट वस्तू न नेता बार्शी सुभाषनगर येथील संतोष गूळमिरे प्रार्थमिक विद्यालय मध्ये इयत्ता 1 ली च्या बालकांना प्रत्येकी 2 वही 1 पेन्सिल व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शी तालुका पोलीस श्री हर्षवर्धन वाघमोडे साहेब हे होते.
पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीचे विभाग प्रमुख- श्री उमेश आनेराव, उपविभाग प्रमुख- श्री समाधान विधाते, शहराध्यक्ष- श्री अभिजीत माळी, महिला शहराध्यक्ष- सुप्रियाताई काशीद, बळेवाडी चे शाखाप्रमुख व बी.पी.एस.लाईव्ह न्युज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- श्री सम्मेद तरटे, प्रमुख मार्गदर्शक- श्री भगवान लोकरेसर श्री विजय माळी आनंद बोराडेसंतोष दराडे अजय काकडे.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक- श्री गणेश कदम सर, मा. निहाल शेख सर, मा. मोहम्मद सादिक सर, श्री राजू अखंडेकर सर, शिक्षिका- राजश्री निंबाळकर मॅडम, स्वाती मुंडे मॅडम, शुभांगी नकाते मॅडम, व इतर कार्यकारी मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.