*पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी शहर व तालुका पदाधिकारी, सदस्य नियुक्ती कार्यक्रम सोहळा- मा. उप-निरीक्षक सारिका गटकळ मॅडम यांच्या हस्ते संपन्न.*
बि पि एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. (ता.बार्शी). दि.29-04-2022 रोजी
पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका व शहर.
पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री रवि सर फडणीस यांच्या आदेशानुसार-
आज रोजी नवनिर्वाचित महिला व पुरुष पदाधिकारी, सदस्य यांची
नियुक्ती कार्यक्रम सोहळा बार्शीचे उप-निरीक्षक(PSI) मा.सारिका
गटकळ मॅडम यांच्या हस्ते संघाचे आयकार्ड देऊन नियुक्ती करण्यात आली.
तसेच पो.ना.श्री योगेश इंगोले साहेब यांच्या हस्ते जेन्ट्स यांना
संघाचे आयकार्ड देऊन नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या
वेळी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये पोलीस
बांधव व नागरिक यांना कशा प्रकारे आपण मदत करू शकतो
यावर चर्चा करण्यात आली. तसेच पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी
च्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या विषयावर
सर्वांच्या मते विचारविनिमय करून अतिशय चांगल्या प्रकारे विशेष मीटिंग घेण्यात आली.
PSI गटकळ मॅडम यांनी मागील 2 ते 3 वर्षांपासून पोलिस
जाणीव सेवा संघाने केलेल्या कार्याची दखल घेऊन संघाचे कौतुक केले.
मॅडम म्हणाले की, पोलीस सेवा संघ बार्शी टीम हे प्रत्येक
सामाजिक कार्यात अग्रेसर असते यामध्ये पोलिसांना मदत
करण्यास केव्हाही तत्पर असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त बंदोबस्त असो किंवा इतर कुठलेही
सामाजिक काम असो यावर संघ कायम तत्पर असतो आणि संघ
हा पोलिसांशी निगडीत असल्यामुळे आम्ही पण योग्य त्यारिते
संघाना मदत करू असे आश्वासन गटकळ मॅडम यांनी दिले.
पोलिस जाणीव सेवा संघाच्या महिला व पुरुष टीमने आपणास
मदत करण्यास आम्ही अग्रेसर राहून असे आश्वासन दिले.
यामध्ये पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आनेराव, तालुका उपविभागप्रमुख- समाधान विधाते, तालुका संपर्कप्रमुख- सम्मेद तरटे, अभिजात माळी- बार्शी शहर अध्यक्ष, संघाचे मार्गदर्शक- भगवान लोकरे सर. तसेच महिला नियुक्ती-
सुप्रियाताई काशीद- (बार्शी तालुका अध्यक्षा), रूपालीताई विधाते- (तालुका संपर्कप्रमुख), अमृताताई आनेराव- (तालुका उप संपर्कप्रमुख), रेणुकाताई जाधव- (तालुका संघटक), वर्षाताई तरटे- (बळेवाडी महिला अध्यक्षा), मनीषाताई साळुंखे- (बार्शी शहर अध्यक्ष), कौशल्याताई राऊत- (बार्शी शहर उपाध्यक्ष), मनिषाताई लोकरे- (बार्शी शहर संपर्क प्रमुख), अर्चनाताई शिंदे- (शहर सचिव), वैभवीताई माळी- (शहर उपसचिव), राधाताई घोंगाने- (शहर कार्याध्यक्ष), पूजाताई सातारकर- (शहर संघटक), भाग्यश्रीताई बोंडवे- (शहर सहसंघटक), सुनीताताई मस्के- सदस्य, शारदाताई मोहिते, शिवकन्या कोरे, दुर्गा लोहार राधाताई यमगर.
तसेच संतोष दराडे- (बार्शी तालुका कार्याध्यक्ष), रमेश डोंगरे- (बार्शी शहर कार्याध्यक्ष), सदस्य-
दत्ता माने, विजय माळी, अभिषेक लाला, गणेश सातारकर, विष्णू माने, गणेश यमगर, रणजीत माने, राजगोपाल मालु, अमोल बुके.
इतर सर्वांना पोलीस जाणीव व सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी आय कार्ड देऊन नियुक्ती करण्यात आली.