जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज-शनिवारी होणार पंढरपूर कडे प्रस्थान
प्रतिनिधी - जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. पालखी सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान मार्फत कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान होणार आहे.
शनिवारी पहाटे 5 वाजता पालखी सोहळा प्रमुख,संस्थान चे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या मार्फत विठ्ठल रुक्मिणी व शिळा मंदिर महापूजा होणार आहे :
नंतर पहाटे 5 ते 5.30 वाजता तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळा जनक यांच्या समाधी ची महापूजा होणार आहे :सकाळी 10 ते 12 वाजता संत तुकाराम महाराज पादुका महापूजा व नंतर कीर्तन होऊन पालखी प्रस्थान सोहळा चालू होणार आहे :
दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रमुख कार्यक्रम होऊन पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणा होणार आहे व :सायंकाळी 6.30 वाजता पालखी चा देहूतील इनामदार वाडा या ठिकाणी प्रथम मुक्काम होणार आहे अश्या कार्यक्रम पत्रिकेनुसार 338 वा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान व देहू नगरपंचायत कडून भावीकांसाठी सोई सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.