शेवगाव दरोड्यातील आरोपी जेल बंद

शेवगाव दरोड्यातील आरोपी जेल बंद

शेवगाव :- पायी जाणाऱ्या एका 2 दुचाकी आडव्या लावून लुटणाऱ्या टोळीतील पसार झालेल्या पाच पैकी चार आरोपींना शेवगाव पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. यासंदर्भात इरफान रफिक शेख { वय 21 } जहीर उर्फ जज्जा नवाब शेख,( वय 20) सोमनाथ रामनाथ गवते (वय22) अरबाज शहाबुद्दीन शेख (वय 21) राहणार शेवगाव तर शाहरुख निजाम पटेल (वय23) शेवगाव हा फरार आहे. यातील चार आरोपींना आज कोर्टासमोर हजर केले असता त्यांना मंगळवार 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बाबत माहिती अशी की पस्तीस वर्षीय फिर्यादी हे शनिवारी 6 रोजी शेवगाव नेवासा रोड वरील बॉम्बे मशनरी समोर रात्री ९.१५ वाजता पायी चालले होते. त्याच वेळी त्याच्या समोर एका पल्सर वर तीन व स्कुटी वर बसून दोन जण येऊन थांबले व त्याच्याकडील एप्पल आयपॅड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने आरोपी पळून गेले याबाबत त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तेव्हापासून आरोपी फरार होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील .अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल .व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे .यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन याचा तपास लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विलास पुजारी. यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल. आशिष शेळके. विश्वास पावरा .या अधिकाऱ्याचं सहाय्यक फौजदार भगवान बडदे. पो.हे. काॅ. पांडुरंग वीर. पुरुषोत्‍तम नाकाडे. प्रवीण बागुल .सुखदेव धोत्रे. अशोक लिपणे. सुधाकर दराडे .टेकाळे .महेश सावंत. बप्पासाहेब धाकतोडे .हरी धायतडक .वासुदेव डमाळे .असलम शेख .संपत खेडकर .समीर फकीर .संतोष धोत्रे .चालक रवींद्र शेळके .सोमनाथ घुगे .संगीता पालवे .प्रियंका सिरसाट .आदींची तीन पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला असता .इरफान रफिक शेख( वय 21) जहीर उर्फ जज्जा नवाप शेख (वय20 )सोमनाथ रामनाथ गवते( वय22 )अरबाज शहाबुद्दीन शेख (वय21) या चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे .या सर्व आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करून आज शनिवारी अकरा रोजी कोर्टासमोर हजर केले असता त्यांना मंगळवार (14) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .पुढील तपास पोलिस निरीक्षक विशाल पुजारी करीत आहेत.