आयोध्या येथील नागा गोपालदास महाराजांचे श्रीरामपूर नगरीत भव्य स्वागत.

आयोध्या येथील नागा गोपालदास महाराजांचे श्रीरामपूर नगरीत भव्य स्वागत.

श्रीरामपूर-- श्रीराम भूमी आयोध्या येथे सेवेत असलेले अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय दिगंबर आखाड्याचे नागा गोपालदास महाराज यांचे संत नागेबाबा मल्टी स्टेट पतसंस्थेच्या कार्यालयात आरोग्य मित्र सुभाष दादा गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

                यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, जिल्हाध्यक्ष  दीपक कदम, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष व स्वच्छता दूत म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले आदित्यजी घाटगे, प्रथीतयश व्यापारी विलासराव शेटे, हिंद सेवा मंडळ कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन आदीक जोशी, व्यापारी ज्ञानेश सारंगधर, निशिकांत पंडित, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

               अडीचशे पुरस्कार प्राप्त आरोग्य मित्र सुभाष दादा गायकवाड यांच्या आरोग्य क्षेत्रातील कामा संदर्भात नागा गोपालदास महाराज यांचा संपर्क आला त्यांच्याकडून रुग्णाला झालेल्या मदतीची भावना ठेवून महाराज त्यांच्या भेटीसाठी श्रीरामपूर येथे आले असता अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराच्या झालेल्या प्रांण प्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात माहिती देऊन सर्व धर्मीयांनी आपापसातील मतभेद विचारभेद बाजूला ठेवून एकसंघ राहावे अशी भावना व्यक्त केली पतसंस्थेचे चेअरमन कडू भाऊ काळे यांच्याशीही महाराजांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना व उपस्थित मान्यवरांना आयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले तर आज खरोखर महाराजांचे दर्शन झाले याचा आनंद तर झालाच परंतु आम्ही आयोध्यातच असल्याची जाणीव झाल्याची भावना सुभाष दादा गायकवाड यांनी व्यक्त केली