शिवांकुर विद्यालयाचे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेमध्ये नेत्रदिपक यश .

शिवांकुर विद्यालयाचे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेमध्ये नेत्रदिपक यश .

. *शिवांकुर विद्यालयाचे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेमध्ये यश*

                 रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी पदके मिळवून नेत्र दीपक कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील एकूण 106 विद्यार्थी बसले होते. त्यामधील 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले 10 विद्यार्थ्यांना रौप्य पदक, 5 विद्यार्थ्यांना कांस्यपदक तर 2 विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट व कॉन्सिलेशन प्राईज मिळाले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार व सचिव डॉ प्रकाश पवार यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेतील उत्तुंग यशासाठी संस्थेचे विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके, डॉ नरेंद्र इंगळे, खजिनदार डॉ. किशोर पवार, सौ मंगलताई पवार, युवराज पवार, ज्योतीताई शेळके यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता तारडे व आभार रोहिणी भाकरे यांनी केले. 

               या कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सुनील लोळगे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक, अर्चना पाळंदे, शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.