गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सावनेर पोस्ट ऑफिस येथे एक ही नवीन खातं उघडलेला नाही .
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सावनेर पोस्ट ऑफिस येथे एक ही नवीन खातं उघडलेला नाही .
सावनेर : (दि.14 जानेवारी 2024 )केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील नागरिकांच्या हितासाठी नेहमी पोस्ट ऑफिस येथे निरनिराळ्या योजना राबवित असतात. जेणेकरून नागरिकांना त्या योजनेच्या फायदा एकदम सोप्या पद्धतीने व्हावे . त्याकरिता सर्वप्रथम नागरिकांना पोस्ट ऑफिस येथे खातं उघडुन त्या योजनेच्या लाभ घेता
येईल . मग ते पी.एम. किसान सम्मान निधी योजना असो किंवा लेक लाडकी योजना असे पुष्कळ योजना पोस्ट ऑफिस येथे नागरिकांच्या फायद्यासाठी चालविले जातात .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचं उपक्रम राबविले असता , त्याउपक्रमाद्वरे सरकारी कामात पारदर्शीता यावे व नागरिकांचे शासकीय कार्य जलदगतीने व्हावे आणि नागरिकांना कोणतेही गैरसोय नाही झाली पाहिजे, म्हणून सर्व शासकीय कार्यालय येथे ऑनलाईन कामे करण्याची सक्तीचे आदेश दिलेले आहे .पोस्ट ऑफिस येथे नवीन खाते उघडण्यासाठी महत्त्वाचं कार्य म्हणजे ज्या व्यक्तीला खातं उघडायचं आहे त्याचं अंगुठाच्या ठसा थंब-मशीनमधे घेणे अनिवार्य आहे . जेणेकरून नवीन खातेधारकाला पुढील योजनेच्या लाभ घेता येईल . पण सावनेर पोस्ट ऑफिस येथे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून थंब मशीन खराब व बंद असल्याने ही सुविधा नागरिकांच्या जीवावर बेतली आहे .
तसेच सावनेर पोस्ट ऑफिसच्या अधिकारी कोणतेही नवीन खाते उघडायला स्थानीय नागरिकांना सावनेर शहर सोडून आजूबाजूच्या गावात खाते उघडण्यासाठी पाठवीत आहे . सावनेर पोस्ट ऑफिसच्या अधिकारी यांनी वारंवार त्यांचे मुख्य कार्यालयांच वरिष्ठांना थंब मशीन बाबत तक्रारपत्र पाठवले आहे .वरील मुख्य विभागाकडून (हेड ऑफिस) थंब मशीन येईल तेव्हाच आम्ही नवीन खाते उघडायला सुरुवात करू असे प्रतिउत्तर नागरिकांना मिळत आहे .
( सावनेर पोस्ट ऑफिस अंतर्गत येणारा वघोडा ग्रामपंचायत येथील पोस्ट ऑफिस 11 वाजेपर्यंत उघडलेला नाही .) तसेच सावनेर पोस्ट ऑफिसच्या मुख्य कार्यलयांचे अशा हलगर्जी कारभारामुळे केंद्र सरकार यांचे डिजिटल इंडिया उपक्रमांचे पोट फुगतांना दिसत आहे तसेच एका छोट्याशा थंब मशीनमुळे नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनेपासून वचींत राहावे लागत आहे .
सावनेर पोस्ट ऑफिस येथे केव्हा नवीन खाते उघडायाला सुरुवात होईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .