हिरा गुटखा व पानमसाला विक्रिसाठी वाहतूक करणाऱ्या 6 आरोपिंच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,28,70,000 / - रू . किंमतीचा मुद्देमाल जप्त .

हिरा गुटखा व पानमसाला विक्रिसाठी वाहतूक करणाऱ्या 6 आरोपिंच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,28,70,000 / - रू . किंमतीचा मुद्देमाल जप्त .

महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला हिरा गुटखा व पानमसाला 

विक्रीसाठी, वाहतुक करणा-या 6 आरोपी विरुध्द कारवाई, 

28,70,000/- रु. किंचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

 

 

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पो.नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. 

 

          नमुद आदेशान्वये पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/सचिन आडबल, पोना/संतोष लोढे, पोना/विजय ठोंबरे, संतोष खैरे, पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव व रोहित मिसाळ अशांना बोलावुन अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

 

 

        पथक अवैध धंद्यांची माहिती घेताना पो .नि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे 1) महंमद निपाणीकर व 2) नदीम पठाण दोन्ही रा. बेळगांव, कर्नाटक ü हे त्यांचा हस्तक नामे साजीद ऊर्फ शाहरुख दिवाण व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने हिरा गुटखा व पानमसाला कोल्हापुर येथुन घेवुन मिरजगांव अहमदनगर मार्गे नाशिक जिल्ह्यात त्यांचेकडील अशोक लेलँड गाडी क्र. एमएच/10/सीआर/8313 व एमएच/09/एफएल/6028 या वाहनातुन विक्री करीता घेवुन येणार आहे व त्यांचेपुढे फियाट गाडी क्र. एमएच/10/बीएम 5397 मधील इसम पोलीस दिसल्यास पाठी मागिल वाहनांना माहिती देतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि दिनेश आहेर यांनी दिनांक 10/01/2024 रोजी प्राप्त माहिती पथकास देवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने. पथकाने लागलीच पंचांना सोबत घेवुन नगर सोलापुर रोडने, रुईछत्तीशी गावचे शिवारा 22.00 वा.चे सुमारास सापळ लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात बातमीत नमुद प्रमाणे वाहने येताना दिसल्याने संशयीत वाहनांना बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करुन गाड्या थांबवुन गाडीतील इसमांना पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) सईद ऊर्फ रिजवान अर्शद दिवाण वय 37, रा. रविवार पेठ, कराड, जिल्हा सातारा, 2) इसरार अहमद सलाउद्दीन शेख वय 28, रा. इसकपुर, ता. माटीगंज, जिल्हा आझमगड, राज्य उत्तर प्रदेश, 3) जुबेर सिंकदर डांगे वय 28, रा. कोले, ता. कराड, जिल्हा सातारा व 4) साजीद ऊर्फ शाहरुख अर्शद दिवाण वय 37, रा. रविवार पेठ, मोमीन मोहल्ला, ता. कराड, जिल्हा सातारा असे असल्याचे सांगितले. 

            संशयीतांचे ताब्यातील वाहनांची पंचा समक्ष झडती घेता त्याामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेली हिरा गुटखा व पानमसाला मिळुन आल्याने त्याबाबत अधिक विचारपुस करता आरोपींनी सदर माल हा 5) महंमद सोहेल निपाणीकर (फरार) व 6) नदीम गुलखान पठाण दोन्ही रा. बेळगांव, कर्नाटक (फरार) यांनी नाशिक येथे विक्री करीता घेवुन जाणे करीता दिला असल्याची माहिती दिल्याने आरोपींना विविध प्रकारची हिरा गुटखा व पानमसाला, 2 अशोक लेलँड कंपनीचे टेम्पो व 1 फियाट कार असा एकुण 28,70,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द नगर तालुका पो.स्टे. गु.र.नं. 12/24 भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. 

 

            सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.