आता शाळकरी मुलांना ऑटो-रिक्षातुन वाहतुकीला बंदी*

आता  शाळकरी  मुलांना  ऑटो-रिक्षातुन  वाहतुकीला बंदी*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

सोलापूर.-         शाळकरी मुलांना आता रिक्षामध्ये प्रवास करता येणार नाही.   RTO कडून कारवाईचा इशारा.

शहरांमध्ये साडेपाचशे च्या आसपास शाळा व महाविद्यालय आहेत. बहुतांश पालकांना स्कूल बस परवडत नाही म्हणून त्यांनी रिक्षामध्ये मुलांना शाळेमध्ये पाठवतात. पण मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही कारण एका रिक्षा मध्ये 8 ते10 मुलांच्या आसपास बसवले जातात त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता आर.टी.ओ. ने नवीन पाऊल उचलले आहे.

जर करिता रिक्षाचालकांनी शाळकरी मुलांची वाहतूक केली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि रिक्षा जप्त करण्यात येईल असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) दिला आहे.

शहरातील नामांकित शाळेचे शुल्क परवडत नसल्याने बरेच सर्वसामान्य कुटुंबातील पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत टाकत असतात आणि आपल्या परिसरातील शाळा पाहत असतात.

मुलांना सुरक्षेच्या अनुषंगाने  कसल्याही प्रकारची उपाययोजना केलेल्या नसतात. पण दुसरीकडे असे निदर्शनास येते की एका रिक्षा मध्ये दुप्पटी तिपटीपेक्षा जास्त मुलांची वाहतूक केली जाते पण आता याकडे आर टी ओ चे बारकाईचे लक्ष असणार आहे. आता रिक्षाचालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

तसेच शाळांना पण याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. स्कूल बस मधून येणारी मुले आपला जीव मुठीत धरून शाळेत जात असतात आणि गल्लीबोळातून छोटेे-छोटे रस्त्यातून रिक्षा जात असते. पण बरेच शाळेपुढे शाळेचे फलक सुद्धा नसतात त्यामुळे ह्याचा पण वेगळा त्रास निर्माण होतो.

आता शाळा सुरू होत असल्यामुळे कोणत्याही रिक्षाचालकांना शाळकरी मुलांना वाहतूक करता येणार नाही अन्यथा वाहतूक करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा विजय तिराणकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी दिला.