स्वारगेट प्रकरणात गाढेच्या वकिलांचा धक्कादायक दावा. ७५०० रुपये दिले ?.....?

पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या, स्वारगेट बसस्थानक येथे २५ फेब्रू २०२५ रोजी पहाटे, शिवशाही बस मध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचारांची घटना समोर आली होती, त्यामुळे राज्यासह देशात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे पोलिसांपुढे आरोपीला अटक करण्याचे आव्हान होते, पुणे पोलिसांच्या व नागरिकांच्या अथक प्रयत्नांनी आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले, तेव्हा दत्तात्रय गाढेच्या वकिलांनी कोर्टात धक्कादायक दावा केला आहे.
आरोपीच्या वकिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाढे याचे आणि पिडीत तरुणीचे एक महिन्यापासूनची ओळख होती, तिने मला बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो, मी बलात्कार केला नाही, जे काही झाले ते सहमतीने झाले, तिने माझ्याकडून ७५०० रुपये देखील घेतले, तिचा एजेंट देखील तिथेच होता, आमचा पैशावरून वाद झाला, त्यामुळे पिडीत तरुणीने माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
आरोपीने वकिलांनी अजून एक दावा केलाय, माझे कॉल इतिहास तपासा सर्व सत्य समोर येईल, मी पळून गेलो नव्हतो, मी बराच वेळ तिथेच होतो, नंतर मी माझ्या गावी गेलो, गावात पोलिसांचे पथक आल्याचे बघून मी घाबरलो आणि लपून बसलो होतो.