महाराष्ट्रभर गाजलेल्या निळा झेंडा लावण्याच्या वादातील तांभेरे येथील अटक आरोपीची जामिनावर मुक्तता.
बि पी एस न्युज रिपोर्टर
राहुरी तालुक्यातील तांभेरे गावामध्ये काही दिवसांपुर्वा गावात निळा झेंडा लावण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झालेला होता . त्यातच दोन दिवसांनी असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीघ्या निमित्ताने दिनांक १२/०४/२०२२ रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान काही आंबेडकर आनुयायी महिला व पुरुष परिसराची साफसफाई करण्यासाठी गावातील चौकात जमले असता तांभेरे गावामध्ये निळा झेंडा लावण्याच्या वादातुन गावात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्याला अजीत तांबे,अक्षय तांबे, अशोक तांबे राजू तांबे मार्तण्ड तांबे दिपक तांबे,संजय कांबळे,वैभव चोखर,श्रीकांत तांबे,शुभम तांबे, स्वप्निल तांबे,प्रसाद तांबे,रेखा तांबे,चित्रा तांबे,मंगल तांबे,नंदा तांबे,निता तांबे, अर्चना तांबे,मिना तांबे,भाग्यश्री तांबे,रंजना तांबे,मोनिका तांबे,निता तांबे,अनिता तांबे,संगिता तांबे,उषा तांबे,लतिका तांबे,अनिता तांबे,छबु तांबे,सविता तांबे,मंगल तांबे व इतर दहा सारा इसम वह महिला सर्व राहणार तांभेरे ता.राहुरी अशांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यावरुन वरील सर्व पुरुष व महिला मागासवर्गियांवर भा.द.वि. कलम ३५३,३३२,१४३,१४७,१४९,५०४,२८३,व मुंबई पोलीस अधिनियम १९५१चे कलम १४३,१०३ नुसार गुन्हा दाखल केलेला होता. त्यापैकी चौदा आरोपींना दिनांक १२/०४/२०२२ रोजी अटक झाली होती.तेव्हा पासुन सदरचे आरोपी हे तुरुंगात होते.सदर आरोपींचा जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता.आरोपींच्यावतीने ॲडव्होकेट श्री. सुरेश दिनकर तांबे( तांभेरे) समर्पक व परखड युक्तीवाद करुन आरोपींवर ठेवलेले आरोप हे कसे खोटे व बोगस आहे हे मा.न्यायालयास पटवुन दिले.त्यावर सरकारी वकीलांचा युक्तीवाद होवुन मा.न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज मंजुर करुन तपासाला सहकार्य करण्याच्या एका अटीवर रुपये पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर (जामीन पत्र) आरोपी़ची जामीनावर मुक्तता केली. त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ श्री. पी.एम.संसारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ॲडव्होकेट श्री. सुरेश दिनकर तांबे यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत आरोपींच्या वतीने आरोपींची बाजु मा.न्यायालयासमोर मांडली असुन त्याबद्दल तांभेरे येथील नागरिकांनी ॲडव्होकेट श्री. सुरेश दिनकर तांबे (तांभेर) व वरिष्ठ विधीज्ञ श्री.पी.एम. संसारे यांचे आभार मानले. . ..