श्रीरामपूरातील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र कुटे यांना अटक; गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये सहभागाचा आरोप*
*श्रीरामपूरातील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र कुटे यांना अटक; गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये सहभागाचा आरोप*
*श्रीरामपूर, दि. 7*: गर्भलिंग तपासणी करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून श्रीरामपूरातील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र कुटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. PCPNDT कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम, 1994 नुसार गर्भलिंग तपासणी करणे व त्यासाठी मदत करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. याप्रकरणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक तपास करीत आहे.
डॉ. कुटे यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत, रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. तपासानंतरच सत्य समोर येईल.








