उद्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन', प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी हजर राहणार*

उद्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन', प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी हजर राहणार*

*उद्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन', प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी हजर राहणार*

*अहिल्यानगर, दि. 7*: पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने उद्या शुक्रवार दि. 08 मे 2026 रोजी सकाळी 10:00 ते 12:00 या वेळेत संपूर्ण जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन' पाळण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांच्या पोलीस स्टेशन संदर्भातील प्रलंबित तक्रारी, अडचणी व समस्यांचे जागेवरच निराकरण व्हावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोतवाली पोलीस ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक, तोफखाना येथे उपविभागीय अधिकारी नगर शहर, पारनेर येथे उपविभागीय अधिकारी नगर ग्रामीण, श्रीरामपूर शहर येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर असे विविध ठिकाणी अधिकारी उपस्थित राहतील. इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हजर राहतील.

सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 0241-2416100, 0241-2416138 किंवा 0241-2324175 (PRO) या क्रमांकावर संपर्क साधावा.