अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा फरार आरोपी पुण्यातून जेरबंद, राहुरी पोलिसांची कारवाई*
*अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा फरार आरोपी पुण्यातून जेरबंद, राहुरी पोलिसांची कारवाई*
*राहुरी, दि. 7*: घरात एकटी असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून महिन्याभरापासून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या राहुरी पोलिसांनी पुण्यात आवळल्या आहेत. अय्याज उर्फ वसीम अक्रम आयुब पठाण (22) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दि. 30/03/2026 रोजी राहुरी पोलीस स्टेशनला गु.र.नं. 291/2026 भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 78, 79 व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. एक महिना एक आठवडा उलटूनही आरोपीबाबत तांत्रिक माहिती मिळत नसल्याने तो सापडत नव्हता.
दि. 06/05/2026 रोजी रात्री 8 वाजता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदाराकडून आरोपी पुणे येथे लपल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या परवानगीने PSI राजू जाधव, PHC सुरज गायकवाड, PC गणेश लिपने यांचे पथक पुण्याला रवाना झाले. रात्री 2 वाजता पुणे शहरातून आरोपीला ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशनला आणण्यात आले व अटक करण्यात आली.
आज आरोपीला पोलीस कस्टडी रिमांडसाठी सत्र न्यायालय, अहिल्यानगर येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका

सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, SDPO जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली PI संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात PSI राजू जाधव, PHC सुरज गायकवाड, PHC संभाजी बडे, PC गणेश लिपने, PC संतोष शिंदे, PC प्रमोद ढाकणे, PC अंकुश जाधव, PHC संतोष दरेकर यांनी केली. गुन्ह्याचा तपास PSI राजू जाधव व PC गणेश लिपने करीत आहेत.








