युवानेते मा. श्री. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठाण आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाहसोहळा २०२४
कोपरगांव ( प्रतिनिधी ) :- सहकार महर्षी, माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रेरणेने युवानेते मा. श्री. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठाण आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाहसोहळा २०२४ कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय मैदान येथे अत्यंत उत्साहात, मंगलमय वातावरणात व पंचक्रोशीतील साधू संतमहंत, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभ आशिर्वादाने आदर्शवत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा शंकरराव कोल्हे, कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, श्री. दत्तूनाना कोल्हे, श्री. अमितदादा नितीनराव कोल्हे, श्री. प्रणवदादा पवार, श्री. ईशानभैय्या बिपीनदादा कोल्हे, सौ. मनालीताई अमितदादा कोल्हे, सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे, सौ. श्रद्धाताई ईशानभैय्या कोल्हे आदीसह अध्यात्मिक, सामाजिक राजकीय उद्योग अश्या विविध क्षेत्रीतील मान्यवर, नागरिक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.