निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला योग्य भाव, शासन मदत वेळेवर न मिळणे यामुळे शेतकरी करताहेत आत्महत्या- प्रा.लेवीन भोसले

निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला योग्य भाव, शासन मदत वेळेवर न मिळणे यामुळे शेतकरी करताहेत आत्महत्या- प्रा.लेवीन भोसले

बीड -- (श्रीरामपूर) ::--
   मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद - महाराष्ट्र यांचे वतीने 26 वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन बीड येथे 6 ते 8 नोव्हेंबर 2022 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सोमवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळ प्रथम सत्र शोधनिबंध शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयी झाले. या सत्राचे अध्यक्ष आनंद म्हाळुंगेकर(कोल्हापूर) हे होते. शोधनिबंध वैभव मून (यवतमाळ) वाचन ताकवले यांनी केले. यास प्रतिसाद शेतकरी आत्महत्याची कारणे फ्रेको डिसोझा यांनी सांगितले तर त्यावर उपाय योजना प्रा.लेविन भोसले (श्रीरामपूर) यांनी सादर केल्या.यात शेती पिक, सिंचन महत्व वाढविणे, शेती माल उत्पन्न व त्यास योग्य बाजारभाव, सरकारी योजना, शेतकरी समन्वय, समाज सेवी संस्थेची मदत, अपारंपारिक शेती जनजागृती, भेटी, शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रिय शेतीला उत्तेजन देणे, रासायनिक खतांचा पुरवठा व वापर, शेतीची सध्याची परिस्थिती बद्दल लेविन भोसले यांनी सांगितले. अवकाळी पाउस त्यामुळे शेतीमालाचे झालेले नुकसान कापूस, तूर, सोयाबीन, कांदे यांचे झालेले नुकसान याबद्दल माहिती दिली. वीज प्रश्न रात्रीची वीज दिली जाते शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री अंधारात चाचपडत जातो. तिथे बिबट्या, सर्प, हिंस्र प्राणी यांचा त्रास, उन वारा पाऊस घेत शेतकरी पिकं उभे करतो परंतु योग्य बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. यावर त्यांनी यवतमाळ येथील एक उदाहरण दिले.
      शेतकऱ्यांना 'मी आहे ना' (मैं तू ना) याबद्दल माहिती दिली. शेतकरी आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी मानसशास्त्रीय प्रशिक्षण देणारी 'वर्ल्ड चेबंर फाॅर सोशल बिझनेस' ही स्वंयसेवी संस्था पुढे आलेली आहे. आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांना मानसशास्त्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण मी आहे. ' पिक कर्ज, वीजबिल माफ करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तर त्यांचे समुपदेशन करुन त्यांना सर्वंकष आधार देण्याचे काम जनविकल्प करणार आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाऊन शेती उत्पादनात वाढ होईल असे सांगितले. पिक योजना याविषयी सविस्तर माहिती सोयाबीन पिकासाठी विमा कंपनी गुंठ्यांला 80 रुपये 16 पैसे विमा घेतला पण भरपाई मात्र अवघी 5 रुपये जमा. मात्र अजूनही तेही काही शेतकऱ्यांना मिळाले नाही कारण अति पाऊस झाल्यानंतर 72 तासाच्या आत विमा कंपनीला फोन करावा नाही केला तर विमा रक्कम मिळत नाही. शेवटी परिसंवादाचे अध्यक्ष आनंद म्हाळुंगेकर यांनी शेतकरी आत्महत्या कारणे, उपाययोजना यांचा आढावा घेऊन ठराव संमत केले. यावेळी आशिष शिंदे व फादर यांचे हस्ते आनंद म्हाळुंगेकर कोल्हापूर, लेविन भोसले श्रीरामपूर, फ्रेंको डिसोझा, ताकवले यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देउन सत्कार करण्यात आला..!