स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांना ढोरजळगाव येथे अभिवादन .

स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांना ढोरजळगाव येथे अभिवादन .

स्व.निर्मलाताई काकडे यांना ढोरजळगाव येथे अभिवादन..

 

          आव्हाणे बु :- दि.10-श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे संस्थेच्या संस्थापक मुख्याध्यापिका स्व.निर्मलाताई काकडे यांची 95 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यालयाचे सन्मा.प्राचार्य श्री.संजयजी चेमटे सर, पर्यवेक्षक मा.श्री.सुनील जायभाये सर ,जेष्ठ शिक्षक श्री.भाऊसाहेब टाकळकर व श्री भागचंद मगर आणि मंचावर उपस्थित विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका यांचे शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

             विद्यालयाचे प्राचार्य श्री चेमटे सर यांनी आपल्या मनोगतातून निर्मलाताईंचे शैक्षणिक योगदानाचे महत्त्व पटवून दिले ताईंनी आबासाहेबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला हातभार लावून 25 विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या विद्यालयाचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे याचे साक्षीदार आणि कर्मयोगी आबासाहेब आणि स्व.निर्मलाताई यांच्या विचारांचे वारसदार बनलो आहोत. शिक्षक मनोगतामध्ये श्री मगर सर यांनी स्वर्गीय निर्मलाताईंच्या कार्याची माहिती देताना ताई आदर्श माता होत्या ,आदर्श शिक्षक होत्या व आदर्श प्रशासक होत्या हे सांगितले, त्याचबरोबर ताई शिस्तप्रिय ,शांत स्वभाव व वेळेला महत्त्व देणाऱ्या होत्या हे ही सांगितले. त्यानंतर कवितेतून ताईंचे कर्तुत्व व शैक्षणिक योगदान त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रसंगी विद्यालयातील कु. वाकडे हर्षदा,कु.फसले श्रेया ,कु.जायभाये सिद्धी,कु.पालवे वैष्णवी ,कु.बडे सुकन्या या विद्यार्थिनीनी ताईंचे बालपण त्यांचे शिक्षण,जीवन व शैक्षणिक व सामाजिक कार्य याबद्दल माहिती आपल्या मनोगतातून सांगितली.या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी हजर होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.अमोल भालसिंग यांनी केले व आभार श्री.सुधाकर आल्हाट यांनी उपस्थितांचे आभार मानले.