लाखाची एक गोष्ट. .! ! प्राथमिक शिक्षकाचा प्रामाणिकपणा. . बँकेकडून आलेले जास्तीचे एक लाख रुपये केले परत. .. !!!

लाखाची एक गोष्ट. .! ! प्राथमिक शिक्षकाचा प्रामाणिकपणा. . बँकेकडून आलेले जास्तीचे  एक लाख रुपये केले परत. .. !!!

श्रीरामपूर ::--
    श्रीरामपूर तालुक्यात नजीक असणाऱ्या वळदगांव या ठिकाणी  कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब घुले यांनी बँके कडून आलेले जास्तीचे 1 लाख रुपये प्रामाणिकपणे परत केले आहेत. 
   घडलेली घटनेची हकीकत अशी की, पढेगाव या ठिकाणी असणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये वळदगांव या ठिकाणी  जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक असलेले भाऊसाहेब घुले यांनी 1 लाख 42 हजार  रुपयांची बँकेला मागणी केली.बँकेने त्यांना 1 लाख 42 हजार रुपया ऐवजी 2 लाख 42 हजार रुपये दिले. ही रक्कम न मोजता प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब घुले यांनी ती रक्कम त्यांच्या ताब्यात असलेल्या पिशवीत टाकून घरी आले. त्यानंतर ही रक्कम भाऊसाहेब घुले यांनी घरी येऊन मोजली असता त्यांना एकदम धक्का बसला. कारण त्यांनी मागितलेल्या रकमेमध्ये तब्बल 1 लाख रुपये जास्तीचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी तातडीने ओव्हरसीस बँक शाखा पढेगाव येथील बँक मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.बँक मॅनेजर यांनी तातडीने बँकेचे कर्मचारी त्यांच्या घरी पाठवून प्रामाणिक शिक्षक भाऊसाहेब घुले यांचा सत्कार केला असता जास्तीचे आलेली 1 लाख रुपये रक्कम भाऊसाहेब घुले यांनी बँकेचे कर्मचारी यांच्या ताब्यात प्रामाणिकपणे दिली. घडलेल्या घटनेवरून असे लक्षात येते की नव्या युगात अनेक पिढ्या घडवणारे प्राथमिक शिक्षक अजूनही प्रामाणिकच आहेत हा आदर्श भाऊसाहेब घुले यांनी समाज्याला दाखवून दिला .
    प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब घुले त्यांच्या प्रामाणिकपणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, सर्व शिक्षक वृंद, तसेच त्यांचा शालेय मित्रांचा मस्ती की पाठशाला असणारा ग्रुप व समाज्यातील मोठ्या स्तरांवरील व्यक्तींकडून भाऊसाहेब घुले यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.या घटनेवरून प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब घुले यांनी नव्या पिढीतील घडणारे विद्यार्थी व समाज यांच्या समोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे..!