बालाजी देडगाव येथे रात्री ड्रोनच्या घिरट्या नागरिकात घबराटीचे वातावरण.
*बालाजी देडगावात रात्री ड्रोनच्या घीरट्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे रात्री १२ ते ०३ वाजे दरम्यान ३ ते ४ ड्रोन घिरट्या घालत कुटे वस्ती व गावात दिसून आले. त्यामुळे देडगाव परिसरावर घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मागील काळात शेवगाव तालुक्यासह जिल्हाभर ड्रोन घीरट्या घालताना दिसून आले होते. तसेच नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथेही काही दिवसापूर्वी दिसले होते. व रात्री देडगाव मध्ये दिसल्याने नेमका काय प्रकार आहे? अशी शंका उपस्थित केली जात आहे. नेमके ड्रोन फिरऊन हायटेक चोरी करण्याचा प्रयत्न आहे का? काही जैविक हल्ला आहे की काय? नेमका काय प्रकार आहे . असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे. गावात व कुकाणा रोड कुटे वस्ती परिसरात रात्री ३ ते ४ ड्रोन लुकलुकताना दिसून आले .रात्रीच्या वेळी का घीरट्या घालत आहे हा नेमकी काय फंडा आहे .व कायम गाव बदलून ड्रोन दिसत आहेत. त्यामुळे दररोज सोशल मीडियावर ड्रोनचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत .त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. तर काही गावात तरुणांनी सोशल मीडियावर ब्रॉडकास्ट ग्रुप बनवून सर्वांना अलर्ट केले जात आहे.
______________________________________________________
रात्री परिसरात ड्रोन परिसरात घिरट्या घालत असेल तर तरुणांनी सर्वांना सतर्क करावे व व ड्रोन चा काय प्रकार आहे याचा पोलीस यंत्रणेने तपास लावावा. गावात व परिसरात पोलिसांनी रात्री पेट्रोलिंग करावी. नागरिकांनी भयभीत न होता सतर्क रहावे.
- देडगाव सरपंच
चंद्रकांत मुंगसे.
______________________________________________________