ज्यांनी दाखवली खाकीची शान,राहुरीकरांना निरीक्षक संजय ठेंगेंचा अभिमान,राहुरी पोलिसांनी हरवलेल्या 26 महिला,अपहरण केलेल्या 13 अल्पवयीन मुली व हरवलेल्या 22 पुरुषांचा लावला शोध.

ज्यांनी दाखवली खाकीची शान,राहुरीकरांना निरीक्षक संजय ठेंगेंचा अभिमान,राहुरी पोलिसांनी हरवलेल्या 26 महिला,अपहरण केलेल्या 13 अल्पवयीन मुली व हरवलेल्या 22 पुरुषांचा लावला शोध.

*विशेष मोहीम अंतर्गत राहुरी पोलीसाकडुन हरवलेल्या 26 महिला, अपहरण केलेल्या 13 अल्पवयीन मुली व हरवलेल्या

22 पुरुष यांचा शोध* 

          अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या राहुरी पोलीस स्टेशन हे सर्वत्र चर्चेत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची कोणत्या ना कोणत्या कारणाने बदली होत असे .त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती . पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी देऊनही न्याय मिळत नसल्याने राहुरी पोलिसांविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता .परंतु म्हणतात ना - भगवान के घर देर है पर अंधार नाही .राहुरी तालुक्याला लाभलेले खमके अधिकारी निरक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अनेक गुन्ह्यांचा उलगडा करून खाकी मध्ये काय ताकत असते हे तालुक्याला दाखवून दिले आहे तसेच जनतेमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण केला आहे .त्याचाच परिणाम म्हणून पोलिसांच्या या चांगल्या कार्याची दखल घेऊन मराठा एकीकरण समितीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आहे .

              मागील काळात राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या विविध मिसिंग मधील व्यक्तींची शोध मोहीम राबवून 26 महिला व 22 पुरुष यांचा शोध घेण्यात आला असून संबंधितांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच 13 अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांनाही त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.अशाप्रकारे अद्याप पर्यंत एकूण 39 महिला व मुलींचा व 22 पुरुषांचा शोध घेण्यात आलेला आहे.

         

               सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सपोनी गणेश चव्हाण पोसई चारुदत्त कोंडे पोसई समाधान पडोळ पोसई, पो.हे.कॉ.सुरज गायकवाड, पो.हे.कॉ.राहुल यादव, पो.हे.कॉ.विकास साळवे,पो.हे.कॉ. पाखरे पो.ना.प्रविण आहिरे, गोपनीय शिंदे , पो.ना.प्रविण बागुल, पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पो.कॉ.नदिम शेख, पो.कॉ. अंकुश भोसले, पो.कॉ.सतिष कुऱ्हाडे , पो.कॉ.सचिन ताजणे, पो.कॉ.गोवर्धन कदम नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे .