महात्मा फुले कृषी विद्यापीठा मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती म.फु.कृ. विद्यापीठात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंन्दोलन या संघटनेचे अहमदनगर जिल्हा प्रमुख प्रविणजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
राजुभाऊ गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तोफांच्या गजरात मानवंदना देण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात तरुणांनी डॉ.बाबा साहेबांच्या जयंती उत्सवात सहभाग घेऊन पुष्प अर्पण केले.
प्रसन्न वातावरणामध्ये भिम सैनिकांनी मिठाईचा आस्वाद घेतला डॉ.बाबासाहेबांचे विचार त्यांनी देशासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सतत पूरे पूर अभ्यास करून जे संविधान देशासाठी अर्पण केले.
त्यांनी केलेले कार्य ही घरा घरा पर्यंत पोहोचावे असं मत प्रविणजी लोखंडे यांनी व्यक्त केले.
भारतातच नव्हे तर जगभरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी होत आहे ज्ञानाचं प्रतिक समतेचा दुत म्हणून जगामध्ये बाबासाहेबांची ओळख आहे त्यांच्या संघर्षमय जिवनाचा अभ्यास जगभरात केला जात आहे अस्पृष्यता जातिव्यवस्था महिलांना समानतेचा अधिकार कामगारांसाठी विविध कायदे अर्थ व्यवस्थेवर प्रबंध नद्याजोड प्रकल्प पाण्याचा सत्याग्रह काळाराम मंदीर प्रवेश उत्कृष्ठ पत्रकारीता गोलमेज परिषद असे विविध उपक्रम बाबासाहेबांच्या जिवनाशी निगडीत असून त्यांनी दुरदृष्टीतून भारतदेशाला दिलेले मजबूत लोकशाहीचे संविधान त्यांनी समाजा प्रति आपल संघर्षमय आयुष्य जगुन या देशातील प्रत्येक नागरिकाला आपले हक्क व अधिकार दिले.
समता बधुता न्याय व स्वातंत्र यावर आधारलेली भारतिय संविधान देशाला समर्पित करून जे महान कार्य केले त्याला उजळा देण्यात आला यावेळी सुरज गोहर. अरविंद मकासरे.अर्जुन मरकड. श्रीधर पवार.राजु कसबे.राजुभाऊ गायकवाड.आविनाश बोरुडे. सलिमभाई शेख.दिलिप बर्डे. जालिंदर गायकवाड.नाना पवार. प्रविण साठे.दिपक पवार. हस्मुदधीन शेख.पोपट पवार. नविन साळवे.मिठु पवार.रवि पडघडमल.किशोर पवार.सागर बिलाडे.गोविंदा पवार.नितिन भोसले.योगेश पवार.कैलास बर्डे. दसरथ उनवणे.बाळासाहेब साळवे.सचिन जगधने.कंटाप्पा टकाळी.कैलास साळुंके.दत्ता पटेकर.डिग्रस ग्रा.मा.सरपंच रावसाहेब पवार.राजु भिंगारदे. मोहन काळे.व इतरांनी जयंती उत्सवात सहभाग घेतला.
यावेळी राहुरी ता.सन्माननिय तहसिलदार फसउद्धीन शेख तसेच पोलिस निरिक्षक मेघश्याम डांगे यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.
राजुभाऊ गायकवाड यांनी उपस्थीतांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व सुरज गोहर यांनी उपस्थितांचे आभार मानले.