श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ.

           श्रीरामपूर (  प्रतिनिधी )  :-    शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व नेत्यांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.

             श्री. वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात उमेदवारी अर्ज दाखल करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे ठरले होते. या नियोजनानुसार शिवसेनेचे पदाधिकारी व माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी आज आ. कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ वाढविण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर. तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक. शिवसेनेचे तालुकाप्रमुख लखन भगत. ज्येष्ठ नेते अशोक थोरे. आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, संभाजी ब्रिगेडचे शिवाजी पवार, कॉ. जीवन सुरडे यांच्यासह माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक राजेश अलघ, लक्ष्मण कुमावत, सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, अमोल आदिक, सागर मुठे, आशिष शिंदे, निखिल कांबळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

              सकाळी १० वा. हनुमान मंदिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची राहुरी येथे सभा असल्याने आ. कानडे यांना सदर सभेस उपस्थित राहणे आवश्यक असल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. तथापि त्यांचे बंधू माजी नगरसेवक अशोक कानडे, सचिन गुजर यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

                 यावेळी बोलताना श्री. गुजर म्हणाले, देशात इंडिया आघाडीशिवाय पर्याय नसून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. वाकचौरे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी झटून कामाला लागावे, त्यासाठी कोणाची वाट न पाहता मीच उमेदवार आहे असे समजून प्रचार सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.

              माजी उपनगराध्यक्ष श्री. छल्लारे म्हणाले, आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आ. कानडे यांच्या समवेत कुणाची वाट न पाहता नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आता कुणाची वाट न पाहता तसेच कुठलाही विचार न करता शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी श्री. वाकचौरे यांना निवडून आणण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेना तालुकाध्यक्ष लखन भगत म्हणाले, आता घरात बसून नियोजन करण्याऐवजी रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आली आहे. शिवसैनिकांनी तन-मन-धनाने श्री. वाकचौरे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

        यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, अशोक थोरे, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, ज्ञानेश्वर मुरकुटे, संभाजी ब्रिगेडचे शिवाजी पवार यांची भाषणे झाली. यानंतर श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून श्री. वाकचौरे यांच्या प्रचाराची फेरी काढण्यात आली. यावेळी सतीश बोर्डे, हरिभाऊ बनसोडे, सुरेश पवार, रमेश आव्हाड, अजिंक्य उंडे, संदीप गुलदगड, भगवान उपाध्ये, आबूबाई कुरेशी, संजय साळवे, तेजस बोरावके, संजय परदेशी, रोहित नाईक, राजेंद्र बोरसे, विजय शेलार, युवासेना तालुका प्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहर प्रमुख सिद्धांत छल्लारे, शरद गवारे, बापू बुधेकर, विशाल दुपाटी, विशाल पापडीवाल, दत्तू करडे, उत्तमराव कल्याणकर, अकिल पठाण, प्रमोद गायकवाड, शिवा छल्लारे, योगेश ढसाळ, विशाल राहिले, बाळू लोळगे, ललित साळवे, किशोर परदेशी, साईनाथ परदेशी, गोपाल अहिरराव, सागर शिंदे, अर्जुन छल्लारे आदींसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

............