A.D.F. इंडिया तर्फे श्रीरामपूर मध्ये ख्रिश्चन धर्म गुरु करिता कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर

A.D.F. इंडिया तर्फे श्रीरामपूर मध्ये ख्रिश्चन धर्म गुरु करिता कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर

श्रीरामपूर :-
 अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी सध्या भारतात ख्रिस्ती समाजावर व चर्चवर होत असलेले हल्ले व खोट्या तक्रारी संदर्भात A.D.F इंडिया तर्फे ख्रिश्चन धर्मगुरु करिता कायदेविषयक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.ह्या शिबिरामध्ये कायद्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.ह्या शिबिराचे प्रमुख प्रवक्ते पास्टर.बापू चौकशे यांनी ख्रिस्ती ‍ समाजावर होत असलेले खोटे आरोप ,हल्ले व अत्याचार ह्या संदर्भात अखंड महाराष्ट्रभर A.D.F इंडिया तर्फे कायदे तज्ञ व उच्च न्यायालय वकील ह्यांना घेऊन. चर्च पास्टर व लीडर लोकांना कायदे  जागृती विषयी हे प्रशिक्षण शिबीर चालू केले आहे.कारण पास्टर व लीडर लोकांना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची खोट्या गुन्हया खाली फसवणूक केली जात आहे. व चर्च हल्ले करून त्यांची फसवणूक केली जात आहे.त्या मुळे A.D.F.  इंडिया म्हणजेच अडव्होकेट फाऊंडेशन  इंडिया तर्फे सबंध महाराष्ट्रातील पास्टर व लीडर लोकांना कायद्याची लढाई, कायद्याने लढता यावी म्हणून कायद्याचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे, जेणेकरून, ख्रिस्ती समाज स्वतःची लढाई स्वतः लढू शकेल. ह्या कार्यक्रमाची पहिली सुरूवात श्रीरामपूर येथून झाली आहे. कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक दीपक कदम, उपाध्यक्ष पा.विजय खाजेकर,पा.एलीशा अमोलिक, पा.सतिश गायकवाड, पा.दिपक शेळके, हि.आशा मसिह,पा.बंटी सातदिवे, ब्र.अमोल,राजाराम देठे, पा.शैलेश अमोलिक, इ.या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच श्रीरामपूर पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पा.राजेश कर्डक, योसेफ वडागळे, पास्टर सुभाष खरात,उपाध्यक्ष पास्टर विजय खाजेकर, पास्टर अमर दिवे,पास्टर सतीश आल्हाट,पास्टर प्रमोद अमोलिक इ.मान्यवराची उपस्थिती होती.तसेच श्री.प्रकाश निकाळे सर,सुभाष तोरणे, विलास पठारे महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अनिल भोसले, अविनाश काळे यांची उपस्थिती होती.

दिपक कदम बीपीएस लाईव्ह न्यूज नेटवर्क  श्रीरामपूर