शेवगाव येथे एमकेसीएल सारथीतर्फे निःशुल्क संगणक प्रशिक्षण .

शेवगाव येथे एमकेसीएल सारथीतर्फे निःशुल्क संगणक प्रशिक्षण .

शेवगाव येथे एमकेसीएल,सारथीतर्फे निःशुल्क संगणक प्रशिक्षण .

          शेवगाव येथील श्रीगुरू कॉम्प्युटर अकॅडमी येथे एमकेसीएल, पुणे व सारथी यांच्याद्वारे मराठा, कुणबी-मराठा मराठा-कुणबी, कुणबी युवक युवतींसाठी छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तीमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण वा निःशुल्क रोजागाराभिमुख प्रशिक्षणास प्रारंभ एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक श्री गणेश आठरे सर व निर्मल ब्राइट चे संचालक श्री आढाव सर यांच्या हस्ते करण्यात आला. , श्रीगुरू कॉम्प्युटर अकॅडमी चे संचालक श्री रोहिदास बडे, मल्टीमेडिया कॉम्प्युटर्स चे श्री. कैलास पाठाडे सर, प्राध्यापक श्री. अप्पासाहेब म्हसके सर आदींसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्री आढाव सर यांनी निवड युवक-युवतींचे अभिनंदन केले. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री आढाव सर यांनी डिजिटल कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स यावर प्रभुत्व मिळवून स्थानिक युवक युवतींना विकसीत केले जाणार आहे. या अभ्यासक्रमात प्रत्येकी १२० तासांचे ४ मॉडल असतील, सहा महिन्यांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींनी नियमित उपस्थित राहून हा मोफत अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक श्री गणेश आठरे यांनी एमकेसीएल क्लिक डिप्लोमा कोर्सेस व एम केसीएलतर्फे भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांयाविषयी माहिती दिली. श्रीगुरू कॉम्प्युटर अकॅडमी चे संचालक श्री रोहिदास बडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व सारथी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्याचे आश्वासन दिले. तसेच १०वी व १२वी तील विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी महाराष्ट्र शासन या कॉम्प्युटर कोर्सला 

व एमकेसीएलच्या विविध कोर्सेसला प्रवेश सुरु आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.