ज्ञानमाऊली शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..!!!

ज्ञानमाऊली शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..!!!

नेवासा 
  घोडेगाव:- बुधवार दि. १३ जुलै २०२२  रोजी ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मॅनेजर फा. सतिश कदम हे होते व प्राचार्य फा. डॉमनिक उपस्थित होते. फा. सतिश आपल्या भाषणात म्हणाले, गुरूंचा नेहमी सन्मान करा. कारण आईवडील आपल्या मुलांना मुलभूत गरजा पुरवितात परंतु गुरू हा विद्यार्थ्यांना पूर्णपणे घडवतात व त्यांना जीवन यशस्वी होण्यासाठी मदत करतात. प्राचार्य फा. डॉमनिक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आज गुरुपौर्णिमा” ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. इथे असलेले प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवत आहे. सर्व शिक्षकांसाठी आम्ही प्रार्थना केली आहे. 
         या प्रसंगी शाळेच्या वतीने इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित केले. तसेच मुलांमुलींनी शिक्षकांवर कविता व गायन केले. 
   हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी खरात मॅडम व दहावीच्या विद्यार्थ्यांनी फार परीश्रम घेतले...