रामटेक येथे स्काऊट्सची राज्य पुरस्कार परीक्षा संपन्न

रामटेक

रामटेक येथे स्काऊट्सची राज्य पुरस्कार परीक्षा संपन्न

*रामटेक येथे स्काऊट्सची राज्य पुरस्कार परीक्षा संपन्न*         BPS LIVE NEWS NETWORK                                 नागपुर :- नागपुर भारत स्काऊट्स आणि गाईड्स कार्यालय अंतर्गत राज्य प्रशिक्षण केंद्र नागार्जुन रामटेक येथे आयोजित स्काऊट्स यांची राज्य पुरस्कार परीक्षा आज संपन्न झाली . राज्य

प्रशिक्षण केंद्र रामटेक येथे 30 नोव्हे. तें 03 डिसें. 2022 या कालावधीत ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेमध्ये यवतमाल, नागपुर आणि चंद्रपुर जिल्ह्याचे एकूण 116 स्काउट्स व 18 स्काउट्स मास्टर सहभागी झाले होते.

परीक्षकांद्वारे अभ्यासक्रमनुसार स्काऊट्सच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या घेण्यात आल्या. या राज्य पुरस्कार परीक्षा शिबिरात अमरावतीचें लीडर ट्रेनर रमेश जाधव हे शिबिर प्रमुख म्हणुन प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच नागपुरचे लीडर ट्रेनर घनश्याम बारापात्रे , नागपुरचे जिल्हा संघटक सत्यशील पाटिल , गडचिरोलीचे जिल्हा संघटक विवेक कहाडे , चंद्रपुरचे जिल्हा संघटक चंद्रकांत भगत यांनी सहकारी म्हणून या शिबिरमध्ये काम पाहिले.