*लोकरंग कला शृंगार कडून अस्तित्व 2023 अंतर्गत विविध स्पर्धा घेऊन महिला दिवस साजरा*

सावनेर

*लोकरंग कला शृंगार कडून अस्तित्व 2023 अंतर्गत विविध स्पर्धा घेऊन महिला दिवस साजरा* 

BPS LIVE NEWS NETWORK                                  सावनेर: महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक राम गणेश गडकरी नाट्यगृहात लोक रंग कला शृंगार त्यांच्या वतीने विविध स्पर्धेच्या आयोजन करून महिला दिवस साजरा करण्यात आला.

महिला कलावंत लोकशाहीर शोभा बागडे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.तर लावणी नृत्यांगना व राज्य नाट्य पुरस्कार प्राप्त वैष्णवी शुक्ला लोकनृत्य कलाकार रूचा देशमुख स्पर्धेच्या परिक्षक होत्या.स्पर्धेतील यशस्वी कलाकारांना पुरस्कृत करण्यात आले यात प्रामुख्याने होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) यासाठी

वैशाली ढोबळे समूह नृत्य स्पर्धेसाठी जय भवानी राजा ग्रुप विकोली तर उपविजेते म्हणून इरा इंटरनॅशनल स्कूल सावनेर एकल नृत्त्यामध्ये कुमारी साई व सोनाली खोब्रागडे प्रथम ठरल्या तर उषा निखाडे व कुमारी समृद्धी नागवे द्वितीय ठरल्या कार्यक्रमाचे आयोजन लोकरंग कलाशृंगार गृह टीमच्या मीनाक्षी गजभिऐ,योगिता घोरमारे,सुवर्णा भगत,आकाशा बरवट यांनी केले तर आयोजनासाठी संगीता डोंगरे स्मिता ठाकरे नमिता इलमकर मोना पवार अनिकेत ढाले राजाभाऊ वैद्य मोरेश्वर सोनटक्के आदींनी सहकार्य केले