*राज्याचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बार्शी शहरामध्ये भव्य स्वागता सहित उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी )
बार्शी. (ता.बार्शी) दि.04-11-2022 रोजी राज्याचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले तसेच विविध ठिकाणचे उद्घाटने व लोकार्पण सोहळा करण्यात आला.
बार्शीच्या विकासासाठी आम्ही राजेंद्र राऊत यांच्या मागणीवरून 700 ते 800 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. जेव्हा जेव्हा राजाभाऊ बार्शीच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी माझ्याकडे आले तेव्हा आम्ही त्यांना खाली हात न जाऊ देता त्यांना निधी उपलब्ध करून दिला. यापुढेही बार्शीच्या विकासासाठी आम्ही काहीही कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी बार्शीकरांना दिले. राजेंद्र राऊत यांनी जलयुक्त शिवाराच्या योजनेच्या अंतर्गत संघर्ष करून पतदर्शी काम केले. तसेच आमच्या सरकारने विकासासाठी दोन योजना आखले आहेत पहिली योजना पंतप्रधान कुसुम योजना व दुसरी मुख्यमंत्री स्वर्फईडर योजना आहे या योजनेअंतर्गत 200 सोलर चे पंप देण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळणार तसेच पुढच्या दोन वर्षात चार हजार मेगा वॅट विजेचे उद्दिष्ट सोलरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच या बार्शी मध्ये 1596 घरकुलाचे व 11 रस्त्याचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच भुयारी गटार ,न्यायालय इमारत, तसेच बार्शी शहरातील अनेक रस्ते तलाव व रखडलेली कामे, उपसा सिंचन योजना असे अनेक कामाची मोठी मदत केली आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. तसेच प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिनिधी पूजन करण्यात आले.
तसेच आमदार राजेंद्र राऊत व इतरांच्या हस्ते उप-मुख्यमंत्री फडणवीस यांचा चांदीची गदा व भगवंताची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच बार्शी शहरांमध्ये सोयाबीनचा मोठा प्लांट दर्शना ऑइल मिल उद्योजक दिलीप गांधी यांनी उभा केला. या प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्लांटचा सर्वांना खूप मोठा फायदा होईल तसेच मोठ्या तेल व्यापाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल असेही उद्योजक दिलीप गांधी म्हणाले.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की साहेब तुम्ही बार्शीच्या विकासासाठी भरपूर प्रमाणात निधी दिला त्यामुळे बार्शी चा विकास भरपूर प्रमाणात झाला आहे व होत आहे तसेच यापुढेही बार्शी शहर व तालुक्यासाठी भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा . तेव्हा भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मी कसल्या प्रकारचा निधी बार्शीला कमी पडू देणार नाही तसे मी आश्वासन देतो. यावेळी उपस्थित मान्यवर खासदार राणा जगजीतसिंह पाटील, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, प्रशांत परिचारक, राजाभाऊ धस व इतर मान्यवर उपस्थित होते