साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत नैसर्गिक आपत्ती तथा साथरोग होऊ नये याकरिता प्रा.आ.केंद्र कचारी सावंगा तर्फे आयोजित शुद्धीकरण प्रशिक्षण..!!

            ★ बी.पी.एस.लाईव्ह न्यूज नेटवर्क, दिल्ली ★

    काटोल तालुका प्रतिनिधी-मयुर बी.कुमरे..

काटोल/कचारी सावंगा :-   माहे जुन पासुन मान्सूनची सुरुवात अपेक्षित आहे साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत नैसर्गिक आपत्ती तथा साथरोग होऊ नये याकरिता वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविने व पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण या करिता मा.तालुका आरोग्य अधिकारी काटोल व मा.वैद्यकीय अधिकारी कचारीसांवगा यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.आ.केद्र कचारीसावंगा तर्फे दवाखाना आणि आयु.दवा.मेटपांजरा येथे ग्रा.प.मध्ये पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणारे जलसुरक्षक यांचे **पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण तसेच मान्सूनपूर्व करावयाची उपाययोजना व स्वच्छता सर्वेक्षण याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले.

यावेळी प्रशांत वीरखरे आरोग्य नीरीक्षक यांनी स्वच्छ शुद्ध व निर्जंतुक पिण्याच्या पाण्याचे वितरण व्यवस्थेअंतर्गत प्रतिबंध मान्सूनपूर्व तयारी‌ बाबत माहिती देऊन पाणी शुद्धीकरण कसे करावे या बाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले या वेळी ग्रा.प. क्षेत्रांतील जलसुरक्षक तसेच श्री.काचरे आरोग्य नीरीक्षक तसेच , श्री हेमंत गोंडाने,श्री. वैभवचरपे,श्री.विकास सानप,श्री.खुरसाव,श्रि.धोटे श्री.मनमध जयवार आरोग्य सेवक यांनी सहकार्य केले. .या वेळी रिधोरा येथे *मा.संजयजी डांगोरे पं.स. सदस्य ,स्थानीक संरपंच मा.नलीनी ताई राऊत,वैभवजी राऊत ग्रा.प. सदस्य यांनी प्रशिक्षणास भेट देऊन साथरोग उद्भवू नये या करिता युद्ध पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आव्हान करून मार्गदर्शन केले...!!