देडगाव येथे सशस्त्र क्रांतीचे आद्य गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी.

देडगाव येथे सशस्त्र क्रांतीचे आद्य गुरु वस्ताद लहुजी  साळवे यांची पुण्यतिथी साजरी.

बालाजी देडगाव (प्रतिनिधी )नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समोर सशस्त्र क्रांतीचे आद्य गुरु क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

       प्रथम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले

.

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे बलभीम सकट होते .तर यावेळी प्रास्ताविक स्वरूपात पाटबंधारे विभागाचे अधिकारी रावण ससाणे यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या विषयी जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी अशी शपथ घेऊन भारतीय लढ्यात क्रांतीची प्रथम मशाल पेटवणारे प्रथम आद्य गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या जीवनाविषयी अनमोल माहिती देऊन मार्गदर्शन केले.

       यावेळी युवा नेते निलेश कोकरे ,शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष एकनाथ फुलारी, ,कैलास काळे ,पास्टर रवींद्र ससाने, आबासाहेब बनसोडे , ,शिवाजी ससाने, गोपी ससाने ,शेखर ससाने ,विशाल ससाने , म्हातारंदेव कोकरे ,हिरामण फुलारी ,राहुल ससाने, सोनू ससाने ,प्रदीप ससाने, धीरज मोरे ,योगेश काटकर सोहेल शेख ,गणेश शेजुळ, अंबादास गोफने ,अभिषेक ससाने ,आदी मान्यवर व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार नितीन ससाने यांनी मानले.