ऑडिओ क्लिप प्रकरण दाबले जाईल की वाजवले जाईल,विद्यापीठाच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या लागल्यात नजरा .
प्रतिनिधी राहुरी दि 24जुन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील ऑडिओ क्लिप प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनला असून हे प्रकरण वरिष्ठांकडून दाबले जाईल की वाजवले जाईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत .खरे पाहता हा विषय नुसता चर्चेचा नसून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे .या प्रकरणाचा उलगडा करून जर कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने विद्यापीठातील अशा अनेक प्रकरणांचा उलगडा होण्यास सुरवात होईल .भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्यांच्या गळ्यापर्यंत विषय आला तर मी नाही त्यातली .......असे सांगून मूग गिळून बसणारे अधिकारी पोपटा सारखे बोलू लागतील मग या सर्व प्रकरणांमागचा मास्टरमाईंड कोण हे सर्वांसमोर उघड होईल .त्यासाठी या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे .
ऑडिओ क्लिप प्रकरण हा तर फक्त क्लायमेट आहे पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे . विद्यमान शाखा अभियंताच्या काळात आज पर्यंत जेवढी कामे झाली त्या कामासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अनेक कार्यकर्त्यांनी माहिती विचारली .अनेक आरोप-प्रत्यारोप झाले,त्यासंदर्भात बातम्या प्रकाशित करण्यात आल्या परंतु निर्णय काहीच हाती लागला नाही यावरून असे सिद्ध होते की हमारी पोहोंच बहुत उपर तक है,बाल भी बाका नही कर सकते .त्यामुळेच की काय आज पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही .
याउलट असे दिसून आले आहे की विद्यापीठातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आले या नाट्यमय घटनेमागील सत्य समाजासमोर न येता पडद्यामागे च लपून राहिलेले आहे . या गोष्टीची उलट सुलट चर्चा देखिल विद्यापीठांमध्ये चालू आहे .एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या बिलावरून झालेल्या वादात एका अधिकाऱ्यावर तात्काळ पदमुक्तीची कारवाई झाली असावी अशी खमंग चर्चा परिसरामध्ये चालू आहे .वरिष्ठ अधिकारीही तेच आणि कारवाई करणारे अधिकारीही तेच असल्याने ऑडिओ क्लिप प्रकरणाला कसा न्याय दिला जाईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत .