अहमदनगर : राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावातील पटारे-पगिरे वस्ती वरील अगदी लहानवयात असलेल्या या मुलांनी घरगुती श्री गणेशाची स्थापना केलीय अतिशय आगळी वेगळी आणि ती ही अगदी झिरो बजेट मध्ये...........

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावातील पटारे-पगिरे वस्ती वरील अगदी लहानवयात असलेल्या या मुलांनी घरगुती श्री गणेशाची स्थापना केलीय अतिशय आगळी वेगळी आणि ती ही अगदी झिरो बजेट मध्ये...........

 

त्यांची नावं अशी आहेत -

कौस्तुभ,सिद्धी,वेदिका पगिरे, प्राची, स्नेहा, देवांशी पागिरे सर्व बालगोपाल हे पटारे-पगिरे वस्ती वांबोरी ता. राहुरी जिल्हा अहमदनगर येथील आहेत (वय वर्ष १६,१७,१२,१०,११) कन्या विद्याय वांबोरी येथे ते शिक्षण घेत आहेत. तसेच सर्व बालगोपाल हे शेतकरी कुटंबातील आहेत त्यांनी आपले सर्व कामकाज आणि अभ्यास करूत देखील उर्वरीत वेळेचा सदुपयोग करून आपली ही अनोखी कला जोपासली आहे मागील वर्षी देखील त्यांनी एक आगळा वेगळा देखावा सादर केला होता.

 

१)गणपती आसन- टोपली.२)नारळाच्या शेंड्या, ३)कार्डशीट पेपर वर शंकर पार्वती,४)पेपर रद्दी पासुन गुफा.,५)गोमुख- किचन ओटा, त्यातील नळाचा वापर तसेच रिकाम्या (निकामी) डब्यापासुन.६)झाडाची वाळलेली फांदी. ७)पुष्टा वापरून मंदिर.

पर्यावरणाची हाणी होणार नाही याची विशेष काळजी देखील घेतली आहे.

       श्री गणेशाची स्थापना करतांना मुलांनी पेपर रही नारळाच्या शेंड्या, झाडाची वाळलेली फांदी, टोपले, छमेले, पुष्ठा,हे नैसर्गिक आणि घरगुती साधनाचा वापर करून पैसे खर्च न करता आकर्षक सुंदर सजावट केली.

********************************************

 

१)आज प्रत्येकालाच मोठमोठ्या बंगल्यात रहायला अवडेल पण देव माता दगडाच्या गुहेत राहुन सुध्दा आपले रक्षण करतो. देवाला कशाचाच मोह नसतो म्हणुन मुलांनी पेपर रहीच्या माध्यमातून गुफा तयार केली कोणताही खर्च न करता पोळा सणाला फोडलेल्या नारळाच्या शेंड्या जमवुन नारळातून गणपतीचे दर्शन घडवले. त्याचप्रमाणे गणपतीच्या मागे आई वडील. शंकर पार्वती खंबीरपणे उभे, जसे  प्रत्येकाचे आई वडील आपल्या पाल्यांच्या मागे खंबीर पणे उभे असतात ) हा भाव पेंटिंग आईवडील उभे असतात करून दाखवला.

 

#स्टेजसाठी किचन ओट्याचा वापर केलाय.....

 

२)बेससिंग  व. नळाचा  वापर गोमुखासाठी केला त्यासाठी तेलाचा संपलेला इम वापरला, जीवनात खळखळुन आनंद कसा वाहता असावा त्यासाठी वाहता झरा दाखवला.

३) (अडीअडचणीतून मार्ग काढुन) केदारनाथ सारख्या ठिकाणी प्रत्येकासाच जाणे जमत नाही त्यासाठी कागदी  रद्दी   पुठ्ठ्याचे मंदीर व तुळशीमधील महादेव व नंदी बैल यांच्या दर्शनाचा लाभ घेता यावा, हा प्रयत्न केला.

 

४) आपले सर्वाचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला तयार करून प्रत्येकात स्फुर्ती यावी. आणि त्यांना नमस्कार व्हावा हा प्रयत्न केलाय.

 

या निमित्ताने घरात आनंदाचे, आणि भक्तिमय वातावरण वातावरण निर्माण तर झालेच परंतु जे कोणी मोबाईल सोशल मीडियावर हा देखावा पाहिल तो प्रत्येक व्यक्ती हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून येतोय आणि या लहानग्यांचे तोंडभरून कौतुक देखील करत आहे यातून या मुलांना एक शब्बबास्कीची थाप देखील मिळत आहेच परंतु त्यांना एक नवी प्रेरणा आणि पुढील वेळी अजून यापेक्षाही वेगळं करण्याची इच्छा मनाशी बाळगून आहेत.