देडगाव येथे प्रभू येशूचा जन्मोत्सव नाताळ मोठ्या उत्साहात साजरा.

देडगाव येथे प्रभू येशूचा जन्मोत्सव नाताळ मोठ्या उत्साहात साजरा.

देडगाव:- ( प्रतिनिधी युनूस पठाण )नेवासा तालुक्यातील देडगाव येथे फेअर बँक मेमोरियल चर्च च्या वतीने पास्टर एलिया ब्रदर यांनी बायबल मधील वचनाने प्रभू येशूचा जन्मोत्सव म्हणजेच नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

           यावेळी पास्टर एलीया हिवाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत . प्रथम येशूच्या भजनाचा कार्यक्रम झाला .यामध्ये कुलदीप कणगरे ढोलकी वादक तर संदेश अवताडे बँजो वादक म्हणून लाभले. यानंतर बायबल मधील वचनाद्वारे सर्वांना संबोधित करण्यात आले .तर जगात शांती सुख-समृद्धी नांदो जगामध्ये सर्वांचे कल्याण होवो. सर्व भक्ती भावाने नांदावे अशा विविध प्रार्थना यातून करण्यात आल्या. प्रभू येशू ने जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला होता. व समस्त मानवतेचे कल्याण करून गेला. हा उत्सव जगभरात साजरा केला जातो. अशी वचनाद्वारे माहिती दिली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. लहान मुलींचे गीते, सांस्कृतिक कार्यक्रम यांचाही समावेश करण्यात आला होता.

             प्रभू येशूच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे, विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, झेबाजी कोकरे, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत ससाणे, कानिफनाथ गोयकर ,युवा नेते निलेश कोकरे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले. तर यांचा फेरबॅक मेमोरियल चर्च कमिटीच्या वतीने प्रमुख मान्यवराचा सन्मान करण्यात आला. व देडगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपामध्ये देवाचे सेवक पास्टर एलिया ब्रदर यांचा ही सन्मान करण्यात आला.

             हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी फेअर बँक मेमोरियल चर्च चे अध्यक्ष श्रीकांतभाऊ हिवाळे व सदस्य नितीन हिवाळे, सचिन हिवाळे ,ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे टेलर, शाहूल हिवाळे, शरद हिवाळे, सुनील हिवाळे ,अण्णाभाऊ हिवाळे ,मंडळीचे कारभारी बाबुराव हिवाळे, फास्टर रवी ब्रदर हिवाळे, योसेफ हिवाळे, कांतामामा हिवाळे, राजू अंकल हिवाळे,सागर पगारे ,फकीरचंद हिवाळे ,संदीप हिवाळे, संजय हिवाळे, आकाश हिवाळे, सनी बर्फे ,प्रशांत हिवाळे, विजय हिवाळे, दावीद हिवाळे, आबासाहेब हिवाळे ,जॉन हिवाळे, दिलीप हिवाळे ,कुंडलिक साळवे, सदानंद साळवे, सुनील साबळे ,भारत हिवाळे, प्रताप हिवाळे ,अमोल हिवाळे, दीपक हिवाळे ,प्रदीप हिवाळे, ताराचंद हिवाळे, प्रशांत हिवाळे आदी हिवाळे परिवारांनी कष्ट घेत मोठे सहकार्य केले.

          या सोहळ्यानंतर प्रीती भोजनाची व्यवस्था करण्यात आली