श्री तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते घटस्थापना.

श्री तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते घटस्थापना.

अहमदनगर ( प्रतिनीधी ) अहमदनगर सावेडी पाईप लाईन रोड वरील श्री तुळजाभवानी मंदिर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री.राकेश ओला व सौ. ओला,  तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक, अध्यक्ष अशोक कानडे व सौ. सुनिता कानडे, कु. सानिका कानडे, यांच्या शुभहस्ते घटस्थापना व तुळजाभवानी देवीची महाआरती संपन्न झाली. 

            यावेळी गोपाळराव सजनुले, नवनाथ आंधळे, लक्ष्मीकांत दंडवते, ओमप्रकाश तिवारी, स्मिता शितोळे, लतिका पवार, यांच्यासह तुळजाभवानी महिला मंडळ, युवक मंडळ व पदाधिकारी, भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

              या वर्षी मंदिरामध्ये विविध धार्मिक तसे दसऱ्याला भव्य रावण दहन व दसरा मेळावा याशिवाय दुर्गा सप्तशती पाठ, सामुदायिक कुंकूमार्चन सोहळा, नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिराचे संस्थापक, अध्यक्ष अशोक कानडे यांनी दिली.

               गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत रेणुका भजनी मंडळ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत भक्ती भजनी मंडळ यांचे भजन कार्यक्रम सादर झाले. शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत विठ्ठल भजनी मंडळ, दुपारी ३ ते ५ या वेळेत रुक्मिणी भजनी मंडळ, सायंकाळी ५ ते ५ या वेळेत संस्कृती भजनी मंडळ यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० ते २:३०या वेळेत दुर्गा सप्तशती पाठ, दुपारी ३ ते ५ या वेळेत श्रुती संगीत निकेतन, सायंकाळी ५ ते ७ जीवनकला भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे व रात्री ८ ते १० या वेळेत देवीची पालखी मिरवणूक होणार आहे.

               रविवार दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० ते ३ कुंकूमार्चन सोहळा व  सुवासिनी पूजन होणार आहे. दुपारी ३ ते ४:३० वा. विचार भारती आयोजित ह. भ. प. ॲड. राजश्रीताई कडलक यांचे महिला सुरक्षा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले