महालक्ष्मी हिवरा गावचे रामायणाचार्य ह भ प लक्ष्मण महाराज ( शास्त्री) कदम यांना पितृशोक.

महालक्ष्मी हिवरा गावचे रामायणाचार्य ह भ प लक्ष्मण महाराज ( शास्त्री) कदम यांना पितृशोक.

बालाजी देडगाव ( प्रतिनिधी युनूस पठाण)  :-  नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे गावचे भूमिपुत्र स्वर्गीय परसराम पांडुरंग कदम निधन झाले आहे.

           सांप्रदायिक क्षेत्रामधील असणारे,अतिशय मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन चालणारे, कुटुंब व्यवस्थापक असे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व अल्पशा आजाराने ग्रस्त झाले होते.त्यामुळे वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी ५ ऑक्टोबर गुरुवार रोजी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कदम परिवाराचा आधारवड हरपला. त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

         त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती भामाबाई परसराम कदम, मुलगा ह भ प लक्ष्मण महाराज( शास्त्री )कदम, बाळासाहेब परसराम कदम, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.