ज्ञानेश्वरीने ती रक्कम व्याजासह परत द्यावी. प्रादेशीक सहसंचालक ( साखर ) यांचे आदेश ऊस उत्पादकांमध्ये आनंद.जनशक्ती विकास आघाडीच्या लढ्याला मोठे यश.
आव्हाणे बु :- लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने कपात केलेले प्रतिटन 109 रुपये व्याजासह शेतकऱ्यांना परत देण्याचे आदेश प्रादेशिक सह संचालक साखर मिलिंद भालेराव यांनी दिले आहेत. याबाबत जनशक्ती विकास आघाडीच्या शेतकऱ्यानी तक्रारी अर्ज केले होते. त्याची सुनावणी होऊन आदेश दिले आहेत.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने तालुक्यतील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे 2021-22मधील गळीत हगामात 109रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे कपात केलीली रक्कम शेतकऱ्याना परत करावी. असा निकाल प्रादेशिक सह संचालकांनी दिला असल्याची माहिती जनशक्तीचे अध्यक्ष अँड. श्री. शिवाजीराव काकडे यांनी दिली. ऊस उत्पादकच्या विविध मागण्यासाठी जनशक्ती विकास आघाडीने ऑक्टोबर 2022मध्ये भातकुडगाव येथे शेतकऱ्यचा मेळावा घेतला. यामध्ये ही मागणी केली आहे. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्याचे अनधिकृत कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी म्हणून भागचंद कुडकर, भाऊसाहेब राजळे, मनोज घोगडे, व जनशक्तीच्या कार्यकर्त्यांना शहरटाकळी येथे हनुमान मंदिरात प्राण तिक उपोषण केले. यावेळी साखर संचालकांनी तोंडी आश्वासन दिले होते. यानंतर शेतकऱ्यांतर्फे जनशक्ती विकास आघाडीने प्रादेशिक सह संचालककडे तक्रार करून कपात केलीली रक्कमची मागणी केली. याबत कारखाना व तक्रारदार शेतकऱ्याचे जबाब घेण्यात आले. यामध्ये कारखाण्याने कपात केलेली रक्कम परत करता येणार नाही. ती ठेवीमध्ये वर्ग केली व कारखान्याने जनरल मिटिंगमध्ये तसा ठरवही घेतला असल्याने म्हणणे सादर केले होते.
प्रादेशिक सहसंचलकानी ऊस उत्पादक च्या ठेवीचे प्रति टन 109रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखण्याच्या कार्यकारी संचलकांना दिले आहेत. हा निकाल लागताच शेतकऱ्यांना एफ आर पी कपात 109रुपये प्रमाणे हवी त्यांना जनशक्ती आघाडीशी संपर्क साधण्याचे आवाहन अँड काकडे साहेब यांनी केले.