दोषींवर सख्त कारवाई करून निर्दोष धर्मगुरूंच्या मुक्ततेसाठी विविध संघटनांची पोलिस उप अधीक्षकांकडे मागणी ख्रिस्ती विकास परिषद व विविध संघटनांच्या वतीने निवेदन.
संगमनेर - (प्रतिनिधी) सोनई येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्यचार प्रकरणात ज्यांचा संबंध नाही अशा धर्मगुरूंनाही अटक झाली. प्रस्तुत धर्मगुरुंचा या प्रकरणाशी दुरान्वये देखील संबंध नाही. सबब त्यांना या दोषारोपातून मूक्त करावे अशी मागणी आज संगमनेरस्थित विविध संघटनांनी पोलीस उप अधीक्षक कार्यालयातील पोलीस हवालदार दत्तात्रय मेंगाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
सोनई येथे ख्रिस्ती धर्मगुरूवर दाखल गुन्हे मागे घेऊन न्याय देण्यासंदर्भात महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, आर पी आय इंडिया एकतावादी, एकता सामाजिक सेवाभावी संस्था, ह्यूमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन व अन्य विविध संघटनांच्या वतीने वरील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला
निवेदनामध्ये म्हटले की, या घटनेतील जे गुन्हेगार असतील त्यांना कडक शासन झाले पाहिजे, ही आमची सर्वांची भूमिका आहे. परंतु काही विशिष्ट विचारधारेच्या पुढार्यांच्या दबावाखाली येऊन स्थानिक माहितीच्या आधारे धर्मगुरूंचा संबंध नसताना या घटनेतील धर्मगुरूंवर पक्षपातीपणा होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर, अनिल भोसले, प्रा. बाबा खरात, अँड. किरण रोहम, लाजारस केदारी, विनोद गायकवाड, कारभारी देव्हारे, शौकतभाई पठाण, मच्छिंद्र जगताप, राजूभाई इनामदार, निलेश रोहम, प्रभाकर चांदेकर, रमेश ओहोळ, सचिन मुंतोडे, बाळासाहेब भोसले, बानूबी शेख, सविता भालेराव, आरती सोनवणे, शबाना शेख, सुलताना शेख, रेश्मा शेख, तैासिफ मणियार आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.Delhi91 Bps Live News - Reporter- Deepak Kadam, Shrirampur.