कोरोना योद्धा व पर्यावरण सेवा पुरस्काराने राहुरीतील श्री . बाळासाहेब पिले व श्री.बाळासाहेब तांबे सन्मानित .
*कोरोना योद्धा व पर्यावरण सेवा पुरस्काराने राहुरीतील श्री . पिले व तांबे सन्मानित*
राहुरी तालुक्यातील श्री . शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक, राहुरी तालुका भाजपा शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष श्री . बाळासाहेब पिले व सचिव श्री .बाळासाहेब तांबे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन अकोले येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात कोरोना योद्धा व पर्यावरण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे उपाध्यक्ष व आदिवासी पर्यावरण सेवा संघाचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री .भीमाशंकर तोरमल व श्री .सतीषराव काळे सर यांच्या हस्ते श्री .छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे श्री .बाळासाहेब पिले तसेच चंद्रागिरी माध्यमिक विद्यालय मांजरीचे श्री .बाळासाहेब तांबे यांना कोरोना महामारी च्या काळात नि:स्वार्थपणे जिवाची पर्वा न करता समाजाची सेवा केल्याबद्दल कोरोना योद्धा सन्मानपत्र तसेच समाजसेवा,कला क्रीडा आरोग्य शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पर्यावरण सेवा सन्मानपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
श्री .पिले व तांबे हे महाराष्ट्र राज्य खासगी माध्यमिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवत असतात तसेच समाज सेवा करण्याचे काम देखील कौतुकास्पद आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील,मा. आमदार शिवाजीराव कर्डिले,डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे,जनरल सेक्रेटरी महेश पाटील,व्हा.चेअरमन दत्तात्रय पाटील ढुस,मा.चेअरमन उदयसिंह पाटील,अधीक्षक श्री पारखे,जेष्ठ संचालक मच्छिंद्र तांबे, उत्तमराव आढाव,रवींद्र म्हसे,प्राचार्य एन.आर. जाधव,पर्यवेक्षीका श्रीमती साळवे आर.पी,शिक्षक प्रतिनिधी युसूफ तांबोळी, शिक्षकेतर प्रतिनिधी भाऊसाहेब पगारे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.