* दि २१ / ०३ / २०२३ रोजी आरडगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सविधान जागर गाव बैठक ,

* दि २१ / ०३ / २०२३ रोजी आरडगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सविधान जागर गाव बैठक ,

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी तहसीलदार शेख साहेब व राहुरीचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन वंचित बहुजन आघाडी व समविचारी संघटना व पक्षांच्या वतीने होणाऱ्या संविधान जागर गाव बैठका संदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी वंचित प्रणित एकलव्य आघाडीचे अध्यक्ष अनिलराव जाधव, वंचितच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई बाचकर, जिल्हा सचिव मनिषा ताई साळवे, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, राहुरी तालुका, उपाध्यक्ष तुकाराम जाधव , राहुरी तालुका मार्गदर्शक बाबुराव मकासारेहजर होते.

 संबंधित बैठका घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे आज देशामध्ये भारतीय संविधानाच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतली जात आहे हा देश सर्व धर्मांचा पंथांचा व जातीचा आहे असं स्पष्ट संविधानात लिहिलेलं असताना सुद्धा काही विकृत मानसिकतेचे लोक हा देश विशेष धर्माचा झाला पाहिजेत अशी भूमिका घेऊन संविधानाच्या व देशाच्या विरोधात खुलेआम देशद्रोह करीत आहेत. तरीदेखील विद्यमान केंद्र सरकार त्यांच्यावर गुन्हे दाखल करताना किंवा कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. अशीच भूमिका देशातील इतर धर्माच्या लोकांनी घेतली असती तर त्यांच्यावर आत्तापर्यंत सरकारने देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले असते.त्यामुळे दलित, आदिवासी,ओबीसी आणि मुस्लिम बांधव या वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. या वातावरणामुळे हा देश आपला आहे की नाही असा संभ्रम या लोकांच्या मनामध्ये येत आहे, आणि असं वाटण हे या देशाच्या हिताचं नाही. म्हणून जनजागृती होणे आवश्यक आहे . 

आज रोजी सरकार शेतकऱ्यांचे लाईट कनेक्शन कट करत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यास नकार देत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यास पैशाचे कारण सांगून टाळाटाळ करत आहे. आणि दुसरीकडे धन दांडगे असलेल्या उद्योगपतींचे हजारो, लाखो कोटींचे कर्ज माफ करीत आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे खाजगीकरण करून कॉन्ट्रॅक्ट बेसवर इथून पुढे नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. असा कायदा पास करून भारतीय संविधानाने एससी, एसटी,ओबीसी आणि मुस्लिम बांधवांना दिलेल्या आरक्षण च रद्द करीत आहे. पुढे एक वर्षांमध्ये विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे आपली सत्तेची पोळी भाजण्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवून हिंदू- मुस्लिम, मंदिर मशीद असा वाद जाणून बुजून समाजामध्ये निर्माण केला जात आहे परंतु अशा घटना आपल्या तालुक्यामध्ये होऊ नये यासाठी सामाजिक सलोखा राखण्यासाठी संबंधित बैठका घेण्यात येत आहेत. तसेच गायरान जमीन व वन जमिनीमध्ये अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर संबंधित जागा करण्यासाठी मोठे जन आंदोलन उभे करण्यासाठी ची रणनीती आखणे. अशा अनेक प्रश्नांची जनजागृती करण्या साठी राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण या ठिकाणच्या गावांमध्ये संविधान जागर गाव बैठका घेण्यात येणार आहे. त्यासाठी आज निवेदन देऊन रीतसर या गावांमध्ये बैठका घेण्यासाठी तहसीलदारांची व पोलिसांची परवानगी घेण्यात आलेली आहे.त्याची सुरुवात उद्या दिनांक 21 मार्च 2023 रोजी आरडगाव या ठिकाणी होत आहे.

आरडगाव मधील बिरोबा मंदिराच्या प्राणांगाणामध्ये ठीक सायंकाळी 6:00 वाजता ही बैठक होत आहे. तरी या बैठकीला वंचित बहुजन आघाडी, संविधान प्रेमी सामाजिक कार्यकर्ते व समविचारी संघटना व पक्षातील कार्यकर्त्यांनी येऊन आपापली भूमिका मांडावी ही विनंती. आज देशाचे संविधान धोक्यात येत आहे परंतु कोणताही राजकीय पक्ष त्यासाठी आवाज उठवताना दिसत नाही. म्हणून आपल्याला भारतीय संविधान जर वाचवायचे असेल तर समाजामध्ये जाऊन त्या संदर्भात जनजागृती करावी लागेल. म्हणून सर्वांनी आपलं कर्तव्य समजून समाज जागृत करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावे आणि या संविधान जागर गाव बैठकीला जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे ही विनंती.. 

(अनिल राव जाधव - अध्यक्ष -वंचित प्रणित एकलव्य आघाडी बहुजन आघाडी) .