अहमदनगर जिल्ह्यात महायुतीच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न.

अहमदनगर जिल्ह्यात महायुतीच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न.

महायुतीच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

 याच पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे महसूल तथा पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात महायुती व सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा मेळावा संपन्न झाला.

या बैठकीला खा.सदाशिव लोखंडे,खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील, आ मोनिका ताई राजळे, आ.बबनराव पाचपुते, आ.प्रा राम शिंदे,आ संग्राम जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डील, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे,भाजपचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल राव लंघे, जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग,शहर अध्यक्ष अभय आगरकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड ,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे व प्रहार जनशक्ती चे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, महिला जिल्हा अध्यक्षा कांचन ताई मांढरे, अश्विनी थोरात यांच्यासह सर्व तालुक्याचे अध्यक्ष आणि महीला,पदाधिकारी व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.