पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायना मांजा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,27, 200/- रु . किंमतीचा प्लास्टिक, नायलॉनचा 27 नग चायना मांजा जप्त.

महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा 27,200/- रुपये किंमतीचा प्लास्टीक, नायलॉनचा 27 नग चायना मांजा जप्त.
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पो.नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा प्लास्टीक, नायलॉनचा चायना मांजा विक्री करणारे इसमा विरुध्द कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पो.नि . दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/राजेंद्र वाघ, पोहेकॉ/ मनोहर गोसावी, विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, पोकॉ/रविंद्र घुंगासे व सागर ससाणे अशा पोलीस अंमलदारांचे विशेष पथक नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. पथकाने अहमदनगर व श्रीरामपूर शहरात पेट्रोलिंग फिरुन प्लास्टीक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणारे इसमांची माहिती घेवुन 2 इसमां विरुध्द कारवाई करुन त्यांचे कब्जातुन मोनो काईट, मोनो फायटर, हिरो प्लस असे वेगवेगळ्या कंपनीचा 27,200/- रुपये किंमतीचा 27 नग नायलॉन मांजा मिळुन आल्याने तो जप्त करुन 2 आरोपीं विरुध्द खालील प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर हरीष खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग व बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.