फेसबुक वर ओळख करून महेलीशी मैत्री केली आणि तिला फोनवर बोलायचे आहे म्हणून तिला त्रास दिला या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला

फेसबुक वर ओळख करून  महेलीशी मैत्री केली आणि तिला फोनवर बोलायचे आहे म्हणून तिला त्रास दिला या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला

राहुरी प्रतिनिधी, 

फेसबुकवर ओळख झालेल्या इसमाने एका काॅलेजमधील प्राध्यापक महिलेला वेग वेगळ्या मोबाईल नंबरवरुन फोन करून मला तुझ्या सोबत बोलायचे आहे, असे म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

         या घटनेतील एक महिला राहुरी तालुक्यातील एका गावात राहत असून त्या एका काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. चार वर्षापूर्वी सदर प्राध्यापक महिलेची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. दि. २५ एप्रिल २०२६ रोजी पर्यंत आरोपीने २० ते २२ मोबाईल नंबरवरुन प्राध्यापक महिलेच्या मोबाईल नंबरवर वारंवार फोन केला. आणि मला तुझ्या सोबत बोलायचे आहे, असे म्हणून प्राध्यापक महिले सोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्या ओळखीचा मुलगा आहे, त्याला पेपरला मदद करा. असे कारण सांगून आरोपीने प्राध्यापक महिलेला वारंवार फोन करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 

          प्राध्यापक महिलेने या घटने बाबत राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी सतिष शिवाजी कांगणे, रा. निंभेरे, ता. राहुरी, याच्या विरूद्ध गुन्हा रजि. नं. ४२२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात हवालदार देविदास कोकाटे हे करीत आहे.

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे