अखंड महाराष्ट्रात मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा.

अखंड महाराष्ट्रात मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा.

प्रतिनिधी:-नगर

        मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अखंड महाराष्ट्र, तेलंगना, कर्नाटक, हरयाना, गुजरात तसेच प्रत्येक जिल्हा, तालूका, गांव आणि प्रत्येक किल्ल्यावर, किल्ले शिवनेरी ते राजधानी किल्ले रायगडावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत शिवछत्रपतींचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या कार्याचा वारसा जनसेवेतून मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान साकार करीत आहे.

      या कार्यक्रमात राज्य पदाधिकारी तसेच प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी त्याचप्रमाणे मावळे तितक्याच उत्साहाने सहभागी होते. मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक/अध्यक्ष अमित चव्हाण, उपाध्यक्ष - मोहन दरेकर, सल्लागार - जयेश बाबर, प्रदेशाध्यक्ष - दिलीप पवार, 

प्रदेश उपाध्यक्ष - विकास निकम, 

आयटी विभाग प्रमुख - माऊली तोवर, 

नोकरी व व्यवसाय प्रमुख - युवराज म्हस्के, 

आंतरसंघटन प्रमुख - शिवव्याख्याते - शुभम केरे, 

महिला अध्यक्षा - अनुराधा ताई घोटाळे, 

महिला प्रदेशाध्यक्ष - शोभा ताई हरगुडे, 

महिला सचिव - प्रियंका ताई खराडे,

तसेच 

सर्व विभागीय, जिल्हा, तालुका अध्यक्ष/उपाध्यक्ष व पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन करण्यात आले होते.

       अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, साफसफाई, शिवव्याख्याने अशा माध्यमातून जनसेवेचे शिवकार्य करण्यात आले.